प्रश्न पेटी
◼ साहित्य कोणाला द्यायचे हे कशावरून ठरवता येईल?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला सुवार्तेत आवड आहे का हे लक्षात घेतले पाहिजे. जर ती खरी आस्था दाखवत असेल तर आपण तिला नियतकालिक, एखादे माहितीपत्रक, पुस्तक किंवा इतर साहित्य देऊ शकतो जे आपण सादर करत आहोत. घरमालक जगभरात चाललेल्या कार्यासाठी फार थोडे किंवा काहीच दान देऊ शकत नाही असे आपल्या लक्षात आले तरीही आपण त्याला साहित्य देऊ शकतो. (ईयो. ३४:१९; प्रकटी. २२:१७) पण आपण आपले मौल्यवान साहित्य अशा लोकांना देणार नाही जे त्याची कदर करत नाहीत.—मत्त. ७:६.
घरमालकाला आवड आहे हे कसे दिसून येईल? आपल्याशी संभाषण करायला तो तयार आहे हीच गोष्ट दाखवते की त्याला आस्था आहे. आपण बोलत असताना तो लक्ष देऊन ऐकत असेल, प्रश्नांना प्रतिसाद देत असेल, आणि त्याची मते सांगत असेल, तर या सर्व गोष्टींवरून त्याला सुवार्तेत आस्था आहे हे दिसून येईल. आपण बायबलमधून वचन वाचताना तो जर लक्ष देऊन ऐकत असेल तर यावरून तो बायबलचा आदर करतो हे दिसून येईल. दिलेले साहित्य घरमालक वाचेल का हे त्याला विचारणे सहसा चांगले असते. घरमालकाला खरोखरच आस्था आहे का हे जाणून घेण्यात प्रचारकांनी कुशलता दाखवली पाहिजे. उदाहरणार्थ, रस्त्यावरील साक्षकार्य करताना येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला नियतकालिके, माहितीपत्रके, किंवा पुस्तके देणे योग्य ठरणार नाही. जर एखाद्या व्यक्तीला आवड आहे किंवा नाही याबद्दल आपल्याला शंका असेल तर आपण तिला हस्तपत्रिका किंवा पत्रिका देऊ शकतो.
तसेच साहित्य विभागाकडून एक प्रचारक किती साहित्य घेतो हे, तो जे दान देऊ शकतो यावर अवलंबून नसून त्याला सेवा कार्यासाठी किती साहित्याची गरज आहे यावर अवलंबून असले पाहिजे. आपण जे दान देतो ते साहित्याच्या छपाईसाठी लागणाऱ्या खर्चासाठी नसून जगभरातील प्रचार कार्याशी संबंधित सर्व गोष्टींना हातभार लावण्यासाठी असते. आपली आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी देवाच्या राज्याच्या कार्याला हातभार लावण्यासाठी, देवाप्रती असलेल्या गुणग्राहकतेने प्रेरित होऊन आपण सर्व जण आपल्या विपुलतेतून नव्हे तर आपल्याकडे थोडे जरी असले तरी त्यातूनही उदारतेने दान दिले पाहिजे. (मार्क १२:४१-४४; २ करिंथ. ९:७) या गुणग्राहकतेमुळे आपण आपल्याला लागेल तितकेच साहित्य घेण्यासही प्रेरित होऊ ज्यामुळे देणग्यांच्या रूपात येणारा पैसा वाया जाणार नाही.
[२ पानांवरील चित्र]
एखाद्या व्यक्तीला आस्था आहे अथवा नाही हे प्रचारकांनी विचारपूर्वक ठरवले पाहिजे