वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/११ पृ. १
  • चोवीस तास असतो आपण सुवार्तिक!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चोवीस तास असतो आपण सुवार्तिक!
  • आमची राज्य सेवा—२०११
  • मिळती जुळती माहिती
  • घरोघर साक्ष देणे
    आमची राज्य सेवा—२००६
  • “सुवार्तिकाचे काम कर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • जाहीरपणे व घरोघरी शिकवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • घरोघरचे सेवाकार्य—सध्याच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०११
km १२/११ पृ. १

चोवीस तास असतो आपण सुवार्तिक!

१. पहिल्या शतकातील सुवार्तिकांनी साक्षकार्याला कधीही अर्धवेळेचे काम समजले नाही हे आपण कशावरून म्हणू शकतो?

१ पहिल्या शतकातील आवेशी सुवार्तिकांनी जेथे कोठे लोक भेटतील तेथे त्यांना राज्याची सुवार्ता सांगण्याचे “सोडले नाही.” (प्रे. कृत्ये ५:४२) त्यामुळे घरोघरचे साक्षकार्य करताना येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या लोकांना सुवार्ता न सांगताच ते पुढे गेले असतील असे होऊ शकत नाही. तसेच साक्षकार्य झाल्यावर बाजारात खरेदी करताना त्यांनी अनौपचारिक साक्षकार्य करण्याच्या संधींचादेखील फायदा घेतला असेलच. येशूप्रमाणेच त्यांनी सुवार्तिकाचे काम हे पूर्णवेळेचे आहे असे मानले.—मार्क ६:३१-३४.

२. आपल्या नावाला जागण्यात काय गोवलेले आहे?

२ नेहमी तयार: यहोवाचे साक्षीदार हे आपले नाव, आपण काय करतो हेच दाखवत नाही तर आपण कोण आहोत हेही या नावावरून दिसते. (यश. ४३:१०-१२) म्हणून आपण आपल्या विश्‍वासाचे समर्थन करण्यासाठी नेहमी तयार असतो, घरोघरचे साक्षकार्य करत नसतानाही. (१ पेत्र ३:१५) अनौपचारिक साक्षकार्य करता येईल अशा परिस्थितींचा आधीच विचार करून साक्ष कशी देता येईल याचा तुम्ही सराव करता का? तुम्ही आवड दाखवणाऱ्‍यांना साहित्य देण्यासाठी ते तुमच्याजवळ ठेवता का? (नीति. २१:५) तुम्ही फक्‍त घरोघरच्या साक्षकार्यातच भाग घेता का, की परिस्थिती अनुरूप असल्यास इतर मार्गांनीही साक्षकार्य करता?

३. रस्त्यावरील साक्षकार्य तसेच बस स्थानक किंवा रेल्वे स्टेशन, पार्कमध्ये, दुकानांमध्ये व इतर प्रकारच्या साक्षकार्यासाठी “पर्यायी” हा शब्द तेवढा योग्य का नाही?

३ “पर्यायी” साक्षकार्य नाही: मागील काळात आपण रस्त्यावरील साक्षकार्य तसेच बस स्थानक किंवा रेल्वे स्टेशन, पार्क, दुकानांमधील व इतर प्रकारच्या साक्षकार्यासाठी “पर्यायी” असा शब्द काही वेळा वापरला आहे. पण “पर्यायी” या शब्दावरून अशा प्रकारचे साक्षकार्य असामान्य, अपारंपरिक किंवा ऐच्छिक आहे असा अर्थ येऊ शकतो. प्रेषित पौलाने म्हटले की त्याने “चार लोकांत” म्हणजेच सार्वजनिक रीत्या आणि घरोघरी साक्षकार्य केले. (प्रे. कृत्ये २०:२०) त्यामुळे “पर्यायी” साक्षकार्यापेक्षा “सार्वजनिक” साक्षकार्य म्हणणे जास्त योग्य ठरेल. हे खरे आहे की आजही घरोघरचे साक्षकार्य, राज्याचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्याची आपली सर्वात महत्त्वाची व परिणामकारक पद्धत आहे. पण पहिल्या शतकातील सुवार्तिकांनी लोकांवर लक्ष केंद्रित केले, घरांवर नाही. त्यांनी प्रत्येक संधीचा, मग ती संधी त्यांना सार्वजनिक ठिकाणी, अनौपचारिक रीत्या किंवा घरोघरचे साक्षकार्य करताना मिळाली असो, त्यांनी तिचा सत्य सांगण्यासाठी उपयोग केला. आपणही आपली सेवा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासारखीच मनोवृत्ती बाळगायला हवी.—२ तीम. ४:५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा