बोलण्यास कचरू नका
१. कशासाठी धाडस लागते, आणि का?
१ तुमची थट्टा केली जाईल या भीतीने तुम्ही कधी शाळेत साक्ष द्यायला कचरला आहात का? बोलण्यासाठी नक्कीच धाडस लागते, आणि खासकरून जर तुमचा लाजाळू स्वभाव असेल तर तुम्हाला अधिकच धैर्याची गरज आहे. तर मग, कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते?
२. शाळेत साक्ष देताना तारतम्य बाळगणे का गरजेचे आहे?
२ तारतम्य बाळगा: शाळा हे तुमचे व्यक्तिगत क्षेत्र असले, तरीही हे लक्षात असू द्या की आपण घरोघरच्या प्रचार कार्यात करतो त्याप्रमाणे शाळेत तुम्ही प्रत्येकाबरोबर बायबलविषयी संभाषण सुरू करावे अशी तुमच्याकडून अपेक्षा केली जात नाही. केव्हा बोलावे आणि केव्हा बोलू नये हे तारतम्य बाळगून ठरवा. (उप. ३:१, ७) वर्गात एखाद्या विषयावर होणाऱ्या चर्चेच्या, किंवा तुम्हाला देण्यात आलेल्या गृहपाठाच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या विश्वासाविषयी सांगण्याची संधी मिळू शकते. किंवा तुमचा शाळासोबती तुम्ही विशिष्ट कार्यक्रमात भाग का घेत नाही याबद्दल विचारू शकतो. काही साक्षीदारांनी शालेय वर्षाच्या सुरुवातीलाच संस्थेची काही प्रकाशने शिक्षकांना देऊन आपण यहोवाचे साक्षीदार असल्याचे त्यांना सांगितले आहे. काहींनी त्यांच्या बेंचवर आपली काही पुस्तके आणि नियतकालिके ठेवली आहेत जेणेकरून त्यांचे शाळासोबती त्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त होऊ शकतील.
३. शाळेत साक्ष देण्यासाठी तुम्ही तयारी कशी करू शकता?
३ तयारी करा: तयारी केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल. (१ पेत्र ३:१५) तेव्हा कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात याचा विचार करा आणि त्यांचे उत्तर तुम्ही कसे द्याल याचाही विचार करा. (नीति. १५:२८) शाळेत काही पुस्तके ठेवण्याची सोय असल्यास बायबल आणि इतर पुस्तके जसे रीझनिंग, तरुणांचे प्रश्न तसेच निर्मितीवर आधारित काही प्रकाशने ठेवा, जेणेकरून गरज पडल्यास तुम्ही त्यांचा उपयोग करू शकाल. कौटुंबिक उपासनेदरम्यान, शाळेत साक्षकार्य करण्याचा सराव करण्याविषयी तुमच्या पालकांना सुचवा.
४. शाळेत साक्षकार्य का करत राहावे?
४ सकारात्मक असा: शाळेत साक्ष देताना तुमची नेहमीच थट्टा केली जाईल असे धरून चालू नका. कदाचित काही जण तुमच्या धाडसाची प्रशंसा करतील आणि कदाचित तुमचे ऐकूनही घेतील. पण तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर निराश होऊ नका. तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे यहोवाला आनंद होईल. (इब्री १३:१५, १६) त्याचे वचन ‘पूर्ण धैर्याने सांगता यावे’ म्हणून त्याला प्रार्थना करत राहा. (प्रे. कृत्ये ४:३०; २ तीम. १:७, ८) एखादी व्यक्ती तुमचा संदेश ऐकेल तेव्हा तुम्हाला किती आनंद होईल याचा विचार करा. कोण जाणे, भविष्यात ती व्यक्ती यहोवाचा सेवकही बनू शकेल!