नमुना सादरीकरण
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
तुमचा संदेश ऐकू इच्छिणाऱ्या घरमालकाला तुम्ही विचारू शकता: “येशू एक चांगला व्यक्ती म्हणून बरेच लोक त्याचा आदर करतात पण तो नेमका कोण होता असे तुम्हाला वाटते? [उत्तरासाठी थांबा.] येशू नेमका कोण होता याबाबतीत शास्त्रवचनात काय सांगितले आहे हे मी तुम्हाला दाखवले तर चालेल का?” जर घरमालकाने आवड दाखवली तर कलस्सैकर १:१५, १६ वाचा. नंतर जुलै ते सप्टेंबरचे नियतकालिक घरमालकाच्या हातात द्या आणि पृष्ठ क्र. २८ च्या पहिल्या पोटमथळ्याखाली असलेल्या माहितीवर आधारित त्याच्याशी चर्चा करा. घरमालकाला नियतकालिक द्या आणि पुढील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची व्यवस्था करा.
टेहळणी जुलै - सप्टेंबर
“जगभरात अनेक ठिकाणी जुगार खेळणे हा प्रकार लोकप्रिय आहे. जुगाराबद्दल तुमचे मत काय आहे? [उत्तरासाठी थांबा.] यापासून आपल्याला सावध राहण्यास मदत करणारे एक तत्त्व मी तुम्हाला दाखवू शकतो का? [जर घरमालकाने आवड दाखवली तर निर्गम २०:१७ वाचा.] जुगाराबद्दल बायबलचा काय दृष्टिकोन आहे याबाबतीत या नियतकालिकात सांगण्यात आले आहे.” पृष्ठ ३० वरील लेख दाखवा.