‘देवाच्या इच्छे प्रमाणे होवो’
१. सेवा वर्ष २०१२ साठी खास संमेलन दिनाचा मुख्य विषय काय आहे आणि या विषयावर चर्चा करणे गरजेचे का आहे?
१ यहोवाच्या इच्छेमुळे आपली निर्मिती झाली. (प्रकटी. ४:११) म्हणूनच, यहोवाची इच्छा काय आहे हे शिकून घेतल्याशिवाय आणि त्याप्रमाणे वागल्याशिवाय आपण आपल्या जगण्याचा हेतू पूर्ण करू शकणार नाही. असे करणे इतके सोपे नाही. कारण, आपल्याला “आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छा” पूर्ण करण्यासाठी आपल्या आंतरीक प्रवृत्तीशी किंवा “परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये” यांच्याशी झुंज करावी लागते. (इफिस. २:३; १ पेत्र ४:३; २ पेत्र २:१०) देवाची मदत नसेल तर “सैतान आपल्याला धरून ठेवेल.” (२ तीम. २:२६) आपल्या २०१२ च्या सेवा वर्षात होणारे खास संमेलन दिन, येशूने आपल्याला शिकवलेल्या प्रार्थनेतील तिसऱ्या मुख्य विनंतीनुसार म्हणजेच “तुझ्या इच्छे प्रमाणे होवो” या विनंतीनुसार कार्य करण्यास मदत करणार आहे.—मत्त. ६:९, १०.
२. कार्यक्रमादरम्यान कोणत्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील?
२ कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळतील: कार्यक्रम ऐकत असताना, पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतात का ते पाहा: देवाचे वचन ऐकण्याव्यतिरिक्त आणखी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? आपल्यासाठी देवाची इच्छा काय आहे हे आपण कसे जाणून घेऊ शकतो? सर्व प्रकारच्या लोकांना मदत करण्याची आपली इच्छा का असली पाहिजे? आपण सुखी समाधानी जीवन कसे मिळवू शकतो? तरुणांनो, तुम्ही यहोवाला काय सिद्ध करून दाखवण्याची गरज आहे? देवाची इच्छा पूर्ण केल्याने कोणते आशीर्वाद मिळतील? आपण इतरांना उत्तेजन आणि प्रोत्साहन देणे निकडीचे का आहे?
३. या आध्यात्मिक पुरवठ्यातून आपल्याला पुरेपूर फायदा कसा मिळू शकतो?
३ मनाने तेथे उपस्थित राहा आणि कार्यक्रम लक्ष देऊन ऐका. पाहुणा वक्ता म्हणून, बेथेलहून एखादा प्रतिनिधी किंवा प्रवासी पर्यवेक्षक तेथे हजर असेल. कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर, त्यांच्याशी आणि जर त्यांचे लग्न झालेले असेल तर त्यांच्या पत्नीशी मनमोकळेपणाने बोला. कार्यक्रमानंतर जेव्हा तुम्ही परत घरी येता तेव्हा, ‘ऐकून विसरणारे’ होऊ नका तर कुटुंबासोबत कार्यक्रमाची उजळणी करा आणि देवाची इच्छा आपण पूर्ण मनाने कशी करू शकतो यावर चर्चा करा.—याको. १:२५.
४. देवाची इच्छा पूर्ण करण्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देणे महत्त्वाचे का आहे?
४ जे स्वतःची इच्छा पूर्ण करण्यातच व्यस्त आहेत आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यास नकार देतात त्यांचा लवकरच यहोवा नाश करणार आहे. (१ योहा. २:१७) देवाची इच्छा पूर्ण करण्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्यास मदत करण्याकरता तयार केलेल्या या समयोचित माहितीबद्दल आपण यहोवाचे किती आभारी आहोत!