ऑगस्ट २९ च्या सप्ताहाचा आराखडा
२९ ऑगस्ट ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३१ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३५ (“शिष्यांसाठी नैतिकतेचा उच्च दर्जा” या पोटमथळ्यापासून ते “जीवनाकडे जाणारा मार्ग” या पोटमथळ्यापर्यंत) (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: स्तोत्रे ११०-११८ (१० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: घोषणा. पृष्ठ ८ वरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून एक प्रात्यक्षिक दाखवा की सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो. “लोकांच्या आवडीनुसार एखादे जुने नियतकालिक किंवा माहितीपत्रक द्या” यावर चर्चा करताना श्रोत्यांनाही सहभागी होण्यास उत्तेजन द्या.
१५ मि: सेवानिवृत्ती—कार्य साध्य करण्याजोगे द्वार. आमची राज्य सेवा, जून २००३, पृष्ठ ५ वरील लेखावर आधारित चर्चा.
१० मि: सप्टेंबर महिन्यात नियतकालिक सादर करण्याकरता तयारी करणे. चर्चा. एक-दोन मिनिटांमध्ये, नियतकालिकातील विषयांची उजळणी करा. त्यानंतर, दोन-तीन लेख निवडा आणि त्यावरील सादरतेत वापरता येतील असे प्रश्न व शास्त्रवचने सुचवण्यास श्रोत्यांना सांगा. हे नियतकालिक आपण घरमालकांना कसे देऊ शकतो त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
गीत २७ व प्रार्थना