वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/११ पृ. ३
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०११
आमची राज्य सेवा—२०११
km ६/११ पृ. ३

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

२७ जून, २०११ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक २ मे ते २७ जून २०११ पर्यंतच्या सप्ताहांत जे सर्व भाग झाले त्यात चर्चा करण्यात आलेल्या साहित्यावर आधारित २० मिनिटांची उजळणी घेतील.

१. ईयोबाने त्याच्याविरुद्ध पाप करणाऱ्‍यांच्यावतीने प्रार्थना करावी अशी यहोवाने त्याच्याकडून जी अपेक्षा केली त्यातून आपण कोणता धडा शिकू शकतो? (ईयोब ४२:८) [टेहळणी बुरूज९८ ८/१५ पृ. ३० परि. ५]

२. आज ख्रिस्ती कोणते “नीतिमत्त्वपूर्वक यज्ञ” अर्पण करतात? (स्तो. ४:५) [टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ४ परि. ६]

३. दाविदाचे अंतर्याम त्याला कशा प्रकारे शिक्षण देतात? (स्तो. १६:७) [टेहळणी बुरूज०४ १२/१ पृ. १४ परि. ९]

४. “आकाश देवाचा महिमा वर्णिते,” ते कसे? (स्तो. १९:१) [टेहळणी बुरूज०४ १०/१ पृ. १० परि. ८]

५. आशा आणि धैर्य यात काय संबंध आहे याबाबतीत स्तोत्र २७:१४ काय सुचवते? [टेहळणी बुरूज०६ १०/१ पृ. २७-२८ परि. ३, ६]

६. स्तोत्र ३७:२१ या वचनाचा, बंधुभगिनींबरोबर असणाऱ्‍या आपल्या व्यवहारावर कसा परिणाम होतो? [टेहळणी बुरूज८९ ११/१ पृ. १७ परि. ८]

७. कृतज्ञता दाखवण्याबाबतीत, आपण बंदिवान असलेल्या एका लेव्याकडून कोणता धडा शिकू शकतो? (स्तो. ४२:१-३) [टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ७ परि. ३]

८. जेरुसलेमला ‘सौंदर्याचा कळस’ का म्हटले आहे? (स्तो. ५०:२) [टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ७ परि. १]

९. दावीद म्हणतो, की “उत्सुकतेच्या आत्म्याने” मला सावर; हा कोणाचा ‘उत्सुकतेचा आत्मा’ आहे? (स्तो ५१:१२) [टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ७ परि. ९]

१०. देवाच्या घरी असणाऱ्‍या हिरव्यागार जैतूनाच्या झाडासारखे आपण कसे होऊ शकतो? (स्तो ५२:८) [टेहळणी बुरूज०० ५/१५ पृ. २९ परि. ६]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा