घोषणा
◼ साहित्य सादरता एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज नियतकालिक. आवड असलेल्या तसेच स्मारकविधीला किंवा संमेलनांना अथवा अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्या परंतु नियमितरीत्या सभांना येत नसलेल्या लोकांना आपण पुन्हा भेटायला जातो तेव्हा त्यांना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक द्यावे. त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्याचा आपला मुख्य हेतू असला पाहिजे. जून: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकाकडे हे पुस्तक आधीपासून असल्यास, पिवळ्या पडणाऱ्या कागदावर किंवा १९९५ च्या आधी छापलेले कोणतेही १९२ पानांचे पुस्तक द्यावे. जुलै आणि ऑगस्ट: तुमच्या मंडळीत उपलब्ध असलेले कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक.
◼ स्मारकविधीच्या दिवशी आपण गीत क्र. ८ व ५ ही दोन गीते गाणार आहोत. तेव्हा त्यांची तालीम केल्यास बरे होईल.
◼ बहुतेक ठिकाणी, एप्रिल, मे व जून हे सुटीचे महिने आहेत. त्यामुळे या महिन्यांमध्ये सेवेत अधिक भाग घेण्याचे उत्तेजन आम्ही बांधवांना देत आहोत. मंडळीतील सेवा समिती, बांधवांच्या काही गटांना, फार कमी वेळा प्रचार कार्य झालेल्या क्षेत्रात किंवा जवळपासच्या एखाद्या क्षेत्रात प्रचार कार्य करण्यासाठी पाठवू शकते. जबाबदार बांधवांना या गटाचे नेतृत्व करण्यास नेमले जाऊ शकते. तुम्ही अशा योजना करत असाल तर त्यांची चर्चा आपल्या विभागीय पर्यवेक्षकांशी करा.