वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/११ पृ. १
  • एक जबरदस्त साक्ष दिली जाईल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक जबरदस्त साक्ष दिली जाईल
  • आमची राज्य सेवा—२०११
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांचे स्वागत करा!
    आमची राज्य सेवा—२०१३
  • स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्‍यांना आपण मदत कशी करू शकतो?
    आमची राज्य सेवा—२००८
  • पाहुण्यांचं स्वागत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • स्मारक विधीसाठी त्यांचे स्वागत आहे असे त्यांना वाटू द्या
    आमची राज्य सेवा—१९९४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०११
km ४/११ पृ. १

एक जबरदस्त साक्ष दिली जाईल

१. स्मारकविधीदरम्यान दिल्या जाणाऱ्‍या भाषणाव्यतिरिक्‍त, आणखी कोणत्या गोष्टींनी तिथे येणारे प्रभावित होतील? स्पष्ट करा.

१ केव्हा? स्मारकविधीच्या संध्याकाळी. आपल्याबरोबर स्मारकविधीला उपस्थित राहण्याकरता इतरांना आमंत्रित करण्यात आपण बरीच मेहनत घेतली आहे. तेथे आमंत्रित असलेले जे काही ऐकतील फक्‍त त्याच गोष्टींचा नव्हे तर ते जे काही पाहतील त्यांचाही त्यांच्यावर प्रभाव पडणार आहे. जसे की, स्मारकविधीला उपस्थित राहिल्यानंतर एका स्त्रीने, खासकरून तेथे जे पाहिले त्यावर आपले मत व्यक्‍त केले. सर्वांमध्ये असणारा स्नेहभाव, स्वयंसेवकांनी बांधलेली व व्यवस्थित ठेवलेली स्वच्छ इमारत पाहून ती भारावून गेली. त्यामुळे, फक्‍त भाषण देणारा वक्‍ताच नव्हे तर आपण सर्व जण वर्षातील या महत्त्वाच्या कार्यक्रमात साक्ष देण्यात भाग घेत असतो.—इफिस. ४:१६.

२. आपल्यापैकी प्रत्येक जण तेथे येणाऱ्‍यांना कशा प्रकारे साक्ष देऊ शकतो?

२ इतरांचे मनापासून स्वागत करा: आपल्या स्मित हास्यामुळे व आनंदी वृत्तीमुळे आपण तेथे येणाऱ्‍यांना साक्ष देऊ शकतो. (योहा. १३:३५) तुम्ही सर्वांशी बोलू शकत नसला तरी तुमच्या जवळपास असणाऱ्‍या व्यक्‍तींना तुम्ही स्वतःची ओळख करून देऊ शकता. (इब्री १३:१, २) अशा व्यक्‍तींकडे लक्ष द्या जे तेथे कोणाला ओळखत नाहीत. कदाचित स्मारकविधीच्या मोहिमेदरम्यान त्यांना कोणीतरी आमंत्रण दिले असावे. तुम्ही त्यांना विचारू शकता, “तुम्ही याठिकाणी पहिल्यांदाच आला आहात का?” त्यांना तुमच्या शेजारी बसवा आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्या. दुसऱ्‍या मंडळीला सभागृह वापरावे लागत असल्यामुळे तुमच्या मंडळीला जर तेथून लवकर निघावे लागत असेल तर तुम्ही त्यांना म्हणू शकता: “तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे मी जाणू इच्छितो. तुम्हाला मी कसं भेटू शकतो?”

३. निष्क्रिय असलेल्यांचे स्वागत आपण कसे करू शकतो?

३ निष्क्रीय असलेल्यांचे स्वागत करा: निष्क्रीय असलेले प्रचारक त्याचबरोबर दर वर्षी फक्‍त स्मारकविधीला उपस्थित राहणारे काही जणही येतील यात काहीच शंका नाही. त्यांचे मनापासून स्वागत करा आणि त्यांना पाहून तुम्ही खरोखरच खूप आनंदी झाला आहात हे दाखवा. (रोम. १५:७) स्मारकविधीच्या काही दिवसांनतंरच वडीलजन अशा लोकांना, त्यांनी पुन्हा मंडळीबरोबर सहवास राखण्याचे सुरू करावे असे उत्तेजन देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊ शकतात. तेथे उपस्थित असलेले अनेक जण, ते जे काही ऐकतील फक्‍त त्यानेच नव्हे तर ‘आपली सत्कृत्ये पाहून’ देवाची स्तुती करण्यास प्रवृत्त होतील अशी आपण आशा बाळगू या.—१ पेत्र २:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा