घोषणा
◼ साहित्य सादरता फेब्रुवारी: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य. मार्च: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज नियतकालिक. आवड दाखवलेल्या तसेच स्मारकविधीला किंवा संमेलनांना अथवा अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्या परंतु नियमितरीत्या सभांना येत नसलेल्या लोकांना आपण पुन्हा भेटायला जातो तेव्हा त्यांना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक द्यावे. त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्याचा आपला मुख्य हेतू असला पाहिजे.
◼ २०११ च्या स्मारकविधी दरम्यान दिल्या जाणाऱ्या खास जाहीर भाषणाचा विषय असेल: “बायबलमधील तत्त्वे आपल्याला आजच्या समस्यांना तोंड देण्यास मदत करू शकतात का?”
◼ रविवार १७ एप्रिल, स्मारकविधीच्या दिवशी क्षेत्र सेवेच्या सभेव्यतिरिक्त दुसरी कोणतीही सभा होऊ नये. त्या दिवशी ज्या मंडळ्यांच्या सभा आहेत त्यांनी त्या सभा आठवड्याच्या इतर कोणत्याही दिवशी ठेवाव्यात. ज्या ठिकाणी अनेक मंडळ्या एकच राज्य सभागृह वापरतात व त्यापैकी ज्या मंडळीला सभांची वेळ बदलता येत नसेल तर ती सभा रद्द केली जाऊ शकते. अशा वेळेस, कुटुंबांना प्रोत्साहन दिले जाते की त्यांनी त्या आठवड्याच्या टेहळणी बुरूज अभ्यासाची चर्चा त्यांच्या कौटुंबिक उपासना संध्याकाळी करावी.