वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/११ पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०११
आमची राज्य सेवा—२०११
km २/११ पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

२८ फेब्रुवारी २०११ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक ३ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०११ पर्यंतच्या सप्ताहांत जे सर्व भाग झाले त्यात चर्चा करण्यात आलेल्या साहित्यावर आधारित २० मिनिटांची उजळणी घेतील.

१. हिज्कीयाने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच कोणते कार्य हाती घेतले? आणि आज आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो? (२ इतिहास २९:१६-१८) [टेहळणी बुरूज०९ ६/१५ पृ. ९ परि. १३]

२. लहानपणच्या कोणत्याही वाईट परिस्थितीमुळे, आपण यहोवाची सेवा करण्याचे सोडून देऊ नये, हे आपल्याला २ इतिहास ३४:१-३ या वचनांवरून कसे दिसते? [टेहळणी बुरूज०५ १२/१ पृ. २१ परि. ६]

३. जेरूसलेमचा ७० वर्षांचा विनाशकाळ उचित समयी संपुष्टात आला, हा बायबलमधील अहवाल एज्रा ३:१-६ वचनांवरून कसा सिद्ध होतो? [टेहळणी बुरूज०६ १/१५ पृ. १९ परि. २]

४. देशांतील लोकांबरोबर इस्राएली लोक विवाहाद्वारे संधान बांधत आहेत हे ऐकल्यावर एज्राला धक्का का बसला? (एज्रा ९:१-३) [टेहळणी बुरूज०६ १/१५ पृ. २० परि. १]

५. हे ‘महाजन’ कोण होते व त्यांची कोणती मनोवृत्ती आपण टाळली पाहिजे? (नहेम्या ३:५) [टेहळणी बुरूज०६ २/१ पृ. १० परि. १]

६. अधिपती नहेम्या ख्रिस्ती पर्यवेक्षकांसाठी एक उत्तम उदाहरण कसा आहे? (नहेम्या ५:१४-१९) [टेहळणी बुरूज०६ २/१ पृ. १० परि. ४]

७. नहेम्याच्या दिवसांतील इस्राएल लोकांप्रमाणे आपण कोणत्या अर्थाने कदाचित ‘आपल्या देवाचे मंदिर सोडू’? (नहेम्या १०:३२-३९) [टेहळणी बुरूज९८ १०/१५ पृ. २१-२२ परि. १२]

८. नहेम्याच्या जीवनचरित्रावर मनन केल्यावर आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारण्यास प्रवृत्त होऊ? (नहेम्या १३:३१) [टेहळणी बुरूज९६ ९/१५ पृ. १७ परि. ३]

९. एस्तेरने अहश्‍वरोश राजाबरोबर अनैतिक संबंध ठेवले का? (एस्तेर २:१४-१७) [टेहळणी बुरूज०६ ३/१ पृ. ९ परि. ३]

१०. मर्दखयने हामानास नमन करण्यास नकार का दिला? (एस्तेर ३:२, ४) [टेहळणी बुरूज०६ ३/१ पृ. ९ परि. ४]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा