स्मारकविधीचा काळ—क्षेत्र सेवेत जास्त सहभाग घेण्याची संधी!
१. मार्च, एप्रिल व मे या महिन्यांदरम्यान आपली सेवा वाढवण्याची आपल्याजवळ कोणती कारणे आहेत?
१ येणाऱ्या स्मारकविधीच्या काळात तुम्ही तुमची क्षेत्र सेवा वाढवू शकता का? पुष्कळ ठिकाणी दिवस मोठे असतील. काही प्रचारक कामाला किंवा शाळेला सुट्या असल्यामुळे क्षेत्र सेवेत भाग घेऊ शकतील. २ एप्रिलपासून आपण एका खास मोहिमेत भाग घेणार आहोत. १७ एप्रिल रोजी होणाऱ्या स्मारकविधीला आपल्यासोबत उपस्थित राहण्यास आपण आस्थेवाईक लोकांना या मोहिमेदरम्यान आमंत्रित करणार आहोत. नंतर मग उपस्थित राहिलेल्यांची आवड आणखी वाढवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच, या आस्थेवाईक लोकांना २५ एप्रिलच्या आठवड्यात दिल्या जाणाऱ्या खास भाषणाला उपस्थित राहण्याचे आपण आमंत्रण देणार आहोत. होय, मार्च, एप्रिल व मे या महिन्यांदरम्यान सेवा वाढवण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत.
२. सेवा वाढवण्याचा एक सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?
२ साहाय्यक पायनियरिंग: सेवा वाढवण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे साहाय्यक पायनियरिंग करणे. आपण सर्वच व्यस्त असल्याकारणाने आपल्याला यासाठी आधीच योजना व योग्य ते फेरबदल करावे लागतील. (नीति. २१:५) आपल्या नित्यक्रमातील काही बिनमहत्त्वाच्या गोष्टी आपण नंतर करू शकतो. (फिलिप्पै. १:९-११) साहाय्यक पायनियरिंग करण्याची तुमची इच्छा तुम्ही मंडळीतील इतरांनाही बोलून दाखवू शकता; कदाचित तेही तुमच्याबरोबर पायनियरिंग करण्याचा निर्णय घेतील.
३. कुटुंबातील सदस्य क्षेत्र सेवेतील आपला सहभाग वाढवण्यासाठी काय करू शकतात?
३ पुढील कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळी तुम्ही, कुटुंब यानात्याने कोणती ध्येये ठेवू शकता याची चर्चा करू शकता. (नीति. १५:२२) कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना सहकार्य दिले तर घरातील काही सदस्य एक किंवा अधिक महिने साहाय्यक पायनियरिंग करू शकतील. पण, काहीही केले तरी तुम्हाला पायनियरिंग करणे अशक्य आहे असे वाटत असल्यास काय? तरीही, काही दिवशी संध्याकाळी किंवा शनिवारी-रविवारी क्षेत्र सेवेत जरा जास्त वेळ घालवून कुटुंबातील सदस्य आपला सहभाग वाढवू शकतात.
४. या स्मारकविधीच्या काळादरम्यान आपली सेवा वाढवण्याद्वारे तुम्हाला कोणते आशीर्वाद मिळू शकतात?
४ आपण यहोवाची सेवा करण्यासाठी जो त्याग करतो त्याची तो दखल घेतो. (इब्री ६:१०) यहोवासाठी व इतरांसाठी आपण जे काही करतो त्यात आपल्याला आनंद मिळतो. (१ इति. २९:९; प्रे. कृत्ये २०:३५) या स्मारकविधीच्या काळादरम्यान आपली सेवा वाढवण्याद्वारे मिळणारा आनंद व आशीर्वाद तुम्ही अनुभवू शकता.