२०११ कॅलेंडर कौटुंबिक उपासनेवर भर देते
यहोवाच्या साक्षीदारांचे २०११ कॅलेंडर कौटुंबिक उपासनेवर आधारित आहे. या कॅलेंडरमध्ये आधुनिक आणि बायबल काळातील कुटुंबांची चित्रे आहेत. तसेच यहोवाच्या वचनाचा अभ्यास करत असलेल्या विवाहित जोडप्यांचे आणि अविवाहित जणांची चित्रेदेखील त्यात दाखवली आहेत.
कॅलेंडरवर, बायबलमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या लोकांची चित्रे दाखवण्यात आली आहेत ज्यांना देवाच्या वचनाचे वाचन करण्यास आनंद वाटायचा. यामुळेच त्यांच्या समोर आलेल्या नाना प्रकारच्या समस्यांचा ते यशस्वी रीत्या सामना करू शकले. (स्तो. १:२, ३) आपले कुटुंब मोठे असो अथवा लहान, कुटुंबातील प्रत्येक सदस्य सत्यात असो अथवा नसो, या चित्रांवर मनन केल्याने आपल्याला ही जाणीव होईल की कौटुंबिक उपासना करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या कुटुंबाने कौटुंबिक उपासनेसाठी कोणता दिवस ठरवला आहे हे लिहिण्यासाठी कॅलेंडरवर जागा दिली आहे. तुम्ही ती भरली आहे का?