वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१० पृ. ३
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०१०
आमची राज्य सेवा—२०१०
km १२/१० पृ. ३

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

डिसेंबर २७, २०१० ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक नोव्हेंबर १ ते डिसेंबर २७, २०१० पर्यंतच्या सप्ताहांत जे सर्व भाग झाले त्यात चर्चा करण्यात आलेल्या साहित्यावर आधारित २० मिनिटांची उजळणी घेतील.

१. पहिला इतिहास १६:३४ मध्ये लिखित असलेल्या लेव्यांनी गायिलेल्या स्तुतीगीतावरून आपण काय शिकू शकतो? [w०२ १/१५ पृ. ११ परि. ६-७]

२. पहिला इतिहास २२:५, ९ येथे सांगितलेल्या दाविदाच्या कार्यांतून आपण कोणता धडा घेतला पाहिजे? [w०५ १०/१ पृ. ११ परि. ७]

३. आपला पुत्र शलमोन याला देवाबद्दल कोणत्या भावना असाव्यात अशी दाविदाची इच्छा होती? (१ इति. २८:९) [w०८ १०/१५ पृ. ७ परि. १८]

४. गंगाळसागराच्या खाली बैलांच्या आकृत्यांचा वापर का करण्यात आला होता? (२ इति. ४:२-४) [w०५ १२/१ पृ. १९ परि. ३; w९८ ६/१५ पृ. १६, परि. १७]

५. पूर्वीच्या निवासमंडपातील कोणकोणते सामान शलमोनाने बांधलेल्या मंदिरात ठेवण्यात आले? (२ इति. ५:४, ५, १०) [w०५ १२/१ पृ. १९ परि. ५]

६. दुसरा इतिहास ६:१८-२१ मधील शलमोनाच्या प्रार्थनेवरून आपण कोणता धडा शिकू शकतो? [w०५ १२/१ पृ. १९ परि. ८]

७. दुसरा इतिहास १३:५ मध्ये उल्लेखण्यात आलेला “मीठाचा करार” या संज्ञेचा काय अर्थ होतो? [w०५ १२/१ पृ. २० परि. २]

८. दुसरा इतिहास १७:९, १० ही वचने आपण आपल्या क्षेत्राला कशी लागू करू शकतो? [w०९ ६/१५ पृ. १२ परि. ७]

९. आजच्या काळात देवाचे लोक दुसरा इतिहास २०:१७ मधील शब्दांच्या सामंजस्यात काय करतील? [w०३ ६/१ पृ. २१-२२ परि. १४-१७]

१०. राजा उज्जीयाच्या गर्विष्ठ कार्याच्या अहवालावरून आपण काय शिकतो? (२ इति. २६:१५-२१) [w९९ १२/१ पृ. २६ परि. १-२]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा