डिसेंबर २७ च्या सप्ताहाचा आराखडा
डिसेंबर २७ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: दुसरा इतिहास २५-२८
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
❑ सेवा सभा:
१० मि: घोषणा. “२०११ कॅलेंडर कौटुंबिक उपासनेवर भर देते.” भाषण.
१० मि: प्रचार कार्यात काय बोलायचे याची एक रूपरेषा तयार करणे कशा प्रकारे फायदेकारक ठरू शकते? सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तकाच्या पृष्ठ १६७ पासून पृष्ठ १६८ वरील १ ल्या परिच्छेदातील माहितीवर आधारित चर्चा. पुढील महिन्याच्या सादरतेचा उपयोग करून एका प्रचारकाकडून स्वगत सादर करवून घ्या. तो प्रचारक सेवेला जाण्याआधी, घरमालकाशी आपण काय बोलणार याची दोन-तीन मिनिटांत मनातल्या मनात एक रूपरेषा तयार करतो.
१५ मि: जानेवारीत नियतकालिक सादर करण्याची तयारी करा. चर्चा. एक-दोन मिनिटांत नियतकालिकातील माहितीची उजळणी करा. त्यानंतर, दोन किंवा तीन लेख निवडून त्यांच्या आधारावर सादरता तयार करण्यासाठी श्रोत्यांना प्रश्न व शास्त्रवचने सुचवण्यास सांगा. नियतकालिक कशा प्रकारे सादर करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवा.