वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/१० पृ. २
  • सादर करण्याकरता नवीन माहितीपत्रक!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सादर करण्याकरता नवीन माहितीपत्रक!
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • मिळती जुळती माहिती
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
  • इतरांची खरी काळजी घेऊन यहोवाचे अनुकरण करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • माहितीपत्रकांद्वारे सुवार्तेची घोषणा करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • तुमच्या सेवेत विविध माहितीपत्रकांचा वापर करा
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१०
km १०/१० पृ. २

सादर करण्याकरता नवीन माहितीपत्रक!

१. नोव्हेंबरमध्ये आपण काय सादर करणार आहोत, आणि या माहितीपत्रकाचा उद्देश काय आहे?

१ सन २००९ च्या “जागृत राहा!” या प्रांतीय अधिवेशनात, बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते? हे नवीन माहितीपत्रक प्रकाशित करण्यात आले होते. येत्या नोव्हेंबरमध्ये जगभरातील मंडळ्या हे माहितीपत्रक पहिल्यांदा सादर करणार आहेत. या माहितीपत्रकाचा आपल्या क्षेत्रातील लोकांना फायदा कसा होऊ शकतो? बऱ्‍याच लोकांना, खासकरून जे ख्रिस्ती नाहीत अशा लोकांना बायबल विषयी फार कमी ज्ञान आहे. म्हणून, या माहितीपत्रकाच्या पृष्ठ ३ वर “बायबलचा एकंदरीत दृष्टिकोन” समजावून सांगितला आहे.

२. आपण हे माहितीपत्रक कसे सादर करू शकतो?

२ कसे सादर करावे: जर घरमालक ख्रिस्ती असेल तर [२ तीमथ्य ३:१६ वाचा] आणि असे म्हणा: “या विषयावर तुमचे मत काय? बरेच लोक ज्यांच्याशी आम्ही बोललो ते या वचनातील शब्दांशी सहमत आहेत; इतरांना असे वाटते की बायबल फक्‍त एक पवित्र ग्रंथ आहे. यावर तुमचे काय मत आहे? [उत्तरासाठी थांबा.] आपण कोणत्याही धर्माचे असलो तरी, बायबलचे परीक्षण करण्यासाठी बरीच चांगली कारणे आहेत. [पृष्ठ ३ वरील सर्वात वरचा परिच्छेद वाचा.] या माहितीपत्रकातील, बायबलच्या संदेशाचा धावता सारांश वाचताना तुम्हाला एक रंजक गोष्ट आढळेल. ती म्हणजे, बायबलचा एक मुख्य विषय व संदेश आहे.”

३. ज्या भागातील लोक ख्रिस्ती नाहीत, अशा भागात आपण हे माहितीपत्रक कसे सादरता करू शकतो?

३ आणखी एक सादरता. जे ख्रिस्ती नाहीत परंतु बायबलबद्दल आदर आहे अशा लोकांना आपण असे म्हणू शकतो: “जाचजुलूम व अन्याय सहन करणाऱ्‍या नम्र लोकांबद्दल देवाला काळजी आहे असे तुम्हाला वाटते का? [उत्तरासाठी थांबा.] अशा लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्‍त करणारे देवाने कोणते वचन दिले आहे ते मी तुम्हाला बायबलमधून दाखवले तर चालेल का? [घरमालकाने होकार दिल्यास, स्तोत्र ३७:११ वाचा.] तुम्हाला काय वाटतं, ही भविष्यवाणी पूर्ण होईल तेव्हा ही पृथ्वी कशी असेल? [उत्तरासाठी थांबा.] सगळ्या संस्कृतीच्या व विश्‍वासाच्या लोकांना बायबलमधून आशा व सांत्वन मिळू शकते याचे हे एक उदाहरण आहे.” पृष्ठ ३ वरील सर्वात वरचा परिच्छेद वाचा, आणि मग माहितीपत्रक सादर करा.

४. या माहितीपत्रकाचा उपयोग करून आपण बायबल अभ्यास कसा सुरू करू शकतो?

४ बायबल अभ्यास सुरू करा: पुन्हा भेटायला गेल्यावर घरमालकाला आपण पहिल्या भेटीत कशा विषयी चर्चा केली होती त्याची आठवण करून देऊ शकतो. आणि मग आपण विचारात घेतलेल्या भागातील एक-दोन परिच्छेदांवर, त्या भागाच्या शेवटी दिलेल्या प्रश्‍नांचा उपयोग करून चर्चा करू शकतो. किंवा त्याच वेळी बायबल काय शिकवते हे पुस्तक देणे उचित असेल तर, या माहितीपत्रकाच्या शेवटच्या पृष्ठावरील माहिती त्याच्या सोबत वाचू शकतो. त्याच्या हातात पुस्तक देऊन त्याला एखादा अध्याय निवडू द्या व त्या अध्यायातील एक किंवा दोन परिच्छेदांवर चर्चा करू शकतो. नोव्हेंबर महिन्यात आपण सर्व जण हे माहितीपत्रक आवेशाने सादर करू या!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा