सप्टेंबर २० च्या सप्ताहाचा आराखडा
सप्टेंबर २० ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: दुसरे राजे १९-२२
क्र. १: दुसरे राजे २०:१-११
क्र. २: सौम्य का असावे? (मत्त. ५:५)
क्र. ३: वैवाहिक सोबती गमावल्याच्या दुःखाला तोंड देणे (fy पृ. १७०-१७१ परि. २०-२२)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: मागच्या वर्षी केलेल्या कार्याचा आढावा. सेवा पर्यवेक्षकांचे भाषण. गेल्या सेवा वर्षात मंडळीने केलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे आणि योग्य मुद्द्यांवर सर्वांची प्रशंसा करावी. एक अथवा दोन प्रचारकांना, आलेले उल्लेखनीय अनुभव सांगण्याची आधीच योजना करा. येणाऱ्या सेवा वर्षात मंडळीने ज्यांवर लक्ष दिले पाहिजे असे एक अथवा दोन मुद्दे सांगा आणि सुधारणा करण्याकरता व्यावहारिक सूचना द्या.
१० मि: “सेवा सभेतील भाग हाताळणाऱ्यांसाठी सूचना.” वडिलांचे भाषण.
१० मि: आपल्या मुलाला प्रचारक व्हायला मदत करा. आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००६ पुरवणीतील पृष्ठ १० वरील माहितीवर आधारित चर्चा. एका अशा उदाहरणीय पालकाची मुलाखत घ्या ज्याचा लहान मुलगा/मुलगी बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक आहे. पालकाने आपल्या मुलाला प्रगती करण्यासाठी व एक प्रचारक बनण्यासाठी कोणती मदत दिली होती?