वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/१० पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०१०
आमची राज्य सेवा—२०१०
km ८/१० पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

ऑगस्ट ३०, २०१० ने सुरु होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक जुलै ५ ते ऑगस्ट ३०, २०१० पर्यंतच्या सप्ताहांत जे सर्व भाग झाले त्यात चर्चा करण्यात आलेल्या साहित्यावर आधारित २० मिनिटांची उजळणी घेतील.

१. मंदिराच्या उद्‌घाटनप्रसंगी शलमोनाने केलेल्या प्रार्थनेवर मनन केल्याने यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल आपली कदर कशी वाढते? (१ राजे ८:२२-५३) [w०५ ७/१ पृ. ३० परि. ३]

२. दाविदाने अनेक चुका केल्या होत्या तरी देखील तो यहोवासमोर “खऱ्‍या मनाने” चालला असे का म्हणता येईल? (१ राजे ९:४) [w९७ ५/१ पृ. ५ परि. १-२]

३. शबाच्या राणीने शलमोनाबद्दल “हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य,” असे का म्हटले? (१ राजे १०:४-८) [w९९ ११/१ पृ. २० परि. ५-७]

४. अबीयाला योग्यपणे मूठमाती दिली जावी अशी आज्ञा यहोवाने दिली होती त्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? (१ राजे १४:१३) [w९५ ४/१ पृ. १२ परि. ११]

५. देवाचे भय एखाद्याला धैर्यवान बनवू शकते हे ओबद्याच्या उदाहरणावरून कसे समजते? (१ राजे १८:४) [w०६ १०/१ पृ. २१ परि. १८-१९]

६. “तुम्ही कोठपर्यंत दोन्ही मतांमध्ये लटपटाल?” असे एलीयाने लोकांना म्हटले त्याचा काय अर्थ होता? (१ राजे १८:२१, पं.र.भा.) [w०८ १/१ पृ. १९ परि. ३-४]

७. यहोवा आपल्या सेवकांसाठी त्याच्या शक्‍तीचा वापर कोणत्या उद्देशाने करतो हे एलीयाच्या उदाहरणावरून कसे कळते? (१ राजे १९:१-१२) [w०० ३/१ पृ. १२ परि. १२-१३]

८. नाबोथाने आपला द्राक्षमळा अहाबाला विकण्याचे का नाकारले व यावरून आपण कोणता धडा घेऊ शकतो? (१ राजे २१:३) [w९७ ८/१ पृ. १३ परि. १८-२०]

९. शूनेममधील एका स्त्रीने अलीशासाठी कशा प्रकारे ‘तत्परता दाखवली’? (२ राजे ४:१३) [w९७ १०/१ पृ. ३० परि. ६-८]

१०. अलीशाने नामानाच्या नजराण्याचा स्वीकार का केला नाही? (२ राजे ५:१५, १६) [w०५ ८/१ पृ. ९ परि. २]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा