“ज्ञान आपल्या कृत्याच्या योगे न्यायी ठरते”
१. काही जण आपण करत असलेल्या कामाकडे कोणत्या दृष्टीने पाहतात?
१ आपल्याविषयी गैरसमज झालेले किंवा यहोवाच्या साक्षीदारांबद्दल चुकीची माहिती मिळालेले घरमालक कधीकधी आपला विरोध करतील. पूर्वग्रहदूषित प्रसारमाध्यमात दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे कदाचित त्यांच्या दृष्टिकोनावर परिणाम झाला असेल. काही ठिकाणी यहोवाच्या साक्षीदारांवर, “धर्मांतर करणारे” असा ठपकाच लावण्यात आला आहे. लोक जेव्हा आपली अशा प्रकारे टीका करतात तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असली पाहिजे?
२. लोक आपली टीका करतात तेव्हा कोणती गोष्ट लक्षात ठेवल्याने आपण निराश होणार नाही?
२ सकारात्मक दृष्टिकोन बाळगा: पहिल्या शतकात, येशू आणि यहोवाच्या इतर सेवकांबद्दल लोकांचे सहसा गैरसमज व्हायचे, लोक त्यांच्याविषयी उलट-सुलट बोलायचे. (प्रे. कृत्ये २८:२२) पण या टीकेमुळे त्यांना कधी, ते करत असलेल्या सेवेबद्दल लाज वाटली नाही. येशूने म्हटले: “ज्ञान आपल्या कृत्याच्या योगे न्यायी ठरते.” (मत्त. ११:१८, १९) येशू आपल्या पित्याची इच्छा पूर्ण आवेशाने करीत राहिला; सत्य शोधणाऱ्यांना आज ना उद्या सुवार्तेची किंमत कळेलच याची त्याला खातरी होती. लोकांनी देवाच्या पुत्राचा देखील तिरस्कार केला, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली तर लोक जेव्हा आपला अपमान करतात तेव्हा आपण निराश होणार नाही.
३. आपल्याबद्दलच्या वाईट व विरोधात्मक गोष्टी ऐकल्यावर आपल्याला आश्चर्य का वाटू नये?
३ येशूने सांगितले, की जगाने जसा माझा द्वेष केला तसा माझ्या अनुयायांचा देखील केला जाईल. (योहा. १५:१८-२०) त्यामुळे, आपण जेव्हा आपल्याबद्दलच्या वाईट व विरोधात्मक गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटू नये. उलट, शेवटल्या दिवसांच्या अंताच्या आपण जितक्या अधिक जवळ येतो व सैतानाचा क्रोध जितका अधिक तीव्र होत जातो तितक्या या गोष्टी सर्वसामान्य होण्याची आपण अपेक्षाच केली पाहिजे. (प्रकटी. १२:१२) आणि आपल्याला आनंद झाला पाहिजे कारण, या गोष्टी, सैतानी जगाचा विनाश लवकर होणार असल्याचा पुरावा आहेत.
४. लोक जेव्हा आपला अपमान करतात तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे?
४ दयाळूपणे उत्तर द्या: लोक जेव्हा आपला अपमान करतात तेव्हा आपण त्यांना दयाळूपणे व सौम्यपणे उत्तर दिले पाहिजे. (नीति. १५:१; कलस्सै. ४:५, ६) तुम्हाला जर बोलायची संधी मिळत असेल तर, प्रामाणिक मनाच्या घरमालकांना, यहोवाच्या साक्षीदारांबद्दल असलेला गैरसमज तुम्ही दूर करू शकता. किंवा त्यांना आपल्याबद्दल असे का वाटते ते त्यांना विचारू शकता. आपले कोमल उत्तर ऐकून ते कदाचित, यहोवाच्या साक्षीदारांबद्दल त्यांनी ऐकलेल्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारतील व पुढच्या वेळी जेव्हा साक्षीदार त्यांच्या घरी जातील तेव्हा त्यांचा संदेश ते ऐकतील. पण, जर घरमालक खूपच चिडलेला असेल तर तुम्ही नम्रपणे तेथून निघून जाणे बरे. लोकांचा आपल्याबद्दल कसाही दृष्टिकोन असला तरी, यहोवा मात्र आपल्या सेवेची कदर करतो, हा भरवसा आपण मनी बाळगू शकतो.—यश. ५२:७.