नियतकालिक कसे सादर कराल?
टेहळणी बुरूज एप्रिल - जून
येशूबद्दल आदर असलेल्यांना हे नियतकालिक द्या. “ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना देवाच्या राज्याविषयीची शिकवण दिली, असा सर्वच ख्रिस्ती विश्वास करतात. या राज्यामुळे कोणकोणत्या गोष्टी साध्य होतील, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? [घरमालकाचे उत्तर ऐकून घ्या आणि मग प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.] या लेखात तुम्हाला, त्या राज्याबद्दल असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.” पृष्ठ ८ वर सुरू होणारा लेख दाखवा.