ईश्वरशासित सेवा प्रशाला
एप्रिल २६, २०१० ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक मार्च १ ते एप्रिल २६, २०१० पर्यंतच्या सप्ताहांत जे सर्व भाग झाले त्यात चर्चा करण्यात आलेल्या साहित्यावर आधारित २० मिनिटांची उजळणी घेतील.
१. “परमेश्वर मला प्रतिकूळ झाला, सर्वसमर्थाने मला पीडिले आहे,” असे नामीने का म्हटले? (रूथ १:२१) [w०५ ३/१ पृ. २७ परि. १]
२. कोणत्या गुणांमुळे रूथला “सद्गुणी स्त्री” हे नाव मिळाले? (रूथ ३:११) [w०५ ३/१ पृ. २८ परि. ६]
३. “मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?” असे बोलून एलकानाने त्याच्या पत्नीचे सांत्वन कसे केले? (१ शमु. १:८) [w०५ ४/१ पृ. १९ परि. ३]
४. इस्राएली लोकांनी राजाची केलेली मागणी चुकीची का होती? (१ शमु. ८:५) [w०५ १०/१ पृ. १५ परि. १७]
५. शमुवेल ‘वृद्ध झाला होता आणि त्याचे केस पिकले होते’ तरीसुद्धा त्याने इतरांसाठी प्रार्थना करण्याच्या बाबतीत स्वतःचे उदाहरण कसे मांडले व आपण यावरून काय शिकू शकतो? (१ शमु. १२:२, २३) [w०७ ६/१ पृ. २९ परि. १४-१५]
६. केनी वंशाच्या लोकांची शौलाने खास दखल का घेतली? (१ शमु. १५:६) [w०५ ४/१ पृ. १९ परि. १०]
७. पहिले शमुवेल १६:१७-२३ येथे दिलेली माहिती लक्षात घेता, दावीद कोणाचा पुत्र आहे असे शौलाने का विचारले? (१ शमु. १७:५८) [w०५ ४/१ पृ. २० परि. ८]
८. गथमध्ये असताना दावीदाने गंभीर समस्या ज्या प्रकारे हाताळली त्यावरून आपण काय शिकू शकतो? (१ शमु. २१:१२, १३) [w०५ ४/१ पृ. २१ परि. ४]
९. योनाथानाने आपला मित्र दावीद याला गरजेच्या वेळी पाठिंबा देऊन त्याचे मनोधैर्य वाढवले तेव्हा त्याची नम्रता व प्रेम कसे दिसून आले? (१ शमु. २३:१७) [lv पृ. ३४ परि. १०, तळटीप.]
१०. एन-दोर येथील एका भुतविद्याप्रविण स्त्रीला शौल भेटल्याच्या वृत्तांतातून आपण काय शिकतो? (१ शमु. २८:८-१९) [w०५ ४/१ पृ. २१ परि. ७]