मार्च १५ च्या सप्ताहाचा आराखडा
मार्च १५ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. ४ पृ. ५४-५५ वरील चौकोन
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ शमुवेल ५-९
क्र. १: १ शमुवेल ६:१-९
क्र. २: सैतान व त्याचे दुरात्मे यांचा विरोध करण्याकरता आपल्याजवळ कोणती शस्त्रसामग्री आहे?
क्र. ३: तुमच्या घरात शांती राखा (fy पृ. १२८, परि. १, २)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: “नियमन मंडळाकडून पत्र.” यावर चर्चा करा. जगभरातील अहवालाच्या उल्लेखनीय पैलूंवर टिपणी करायला श्रोत्यांना सांगा.—फेब्रुवारी २०१० च्या आमची राज्य सेवा यातील पुरवणी पाहा.
१५ मि: “अत्यंत महत्त्वाचे काम.” प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ३ वर चर्चा केल्यानंतर प्रगतीशील बायबल अभ्यास चालवणाऱ्या एका प्रचारकाची मुलाखत घ्या. बायबल विद्यार्थ्याला कोणते बदल करावे लागले? यामुळे प्रचारकावर काय परिणाम झाला?