मार्च १ च्या सप्ताहाचा आराखडा
मार्च १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २९ (२२२)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: रूथ १-४
क्र. १: रूथ ३:१-१३
क्र. २: दयाळू असल्याने आपल्याला कसा फायदा होऊ शकतो (मत्त. ५:७)
क्र. ३: मुलांची मदत करणे (fy पृ. १२३ परि. १६-१८)
❑ सेवा सभा:
गीत २८ (२२४)
५ मि: घोषणा.
१० मि: बायबल अभ्यास सुरू करणे. उत्तेजनात्मक अनुभव सांगा आणि एका प्रचारकाची मुलाखत घेऊन कोणती प्रस्तावना स्थानीय क्षेत्रात यशस्वी ठरली आहे हे त्याला विचारा. घरमालक आस्थेवाईक आहे की नाही हे त्याला कसे कळले? त्याने बायबल अभ्यास कसा सादर केला? त्याने बायबल अभ्यास कसा सुरू केला त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवायला त्याला सांगा.
१० मि: स्थानिक गरजा.
१० मि: आपल्या सेवेत दृढ विश्वास दाखवण्याचे महत्त्व. आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००० मधील पुरवणीतील लेखाच्या १ ते ५ परिच्छेदांवर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा.
गीत ९ (३७)