ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
ऑक्टोबर २६, २००९ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल.
१. यहोवानेच बलामाला बालाकाच्या माणसांबरोबर जाण्यास सांगितले होते, मग बलामाविरुद्ध यहोवाचा कोप का भडकला? (गण. २२:२०-२२) [w०४ ८/१ पृ. २७ परि. ३]
२. फीनहास याने यहोवाच्या ‘इर्षेने पेटून’ जे पाऊल उचलले त्यावरून आपण देवाला केलेल्या समर्पणाचा गांभीर्याने विचार करण्यास आपल्याला कशी मदत मिळते? (गण. २५:११) [w९५ ३/१ पृ. १६ परि. १३]
३. मोशेचा उत्तराधिकारी म्हणून यहोशवाची निवड का करण्यात आली? (गण. २७:१५-१९) [w०२ १२/१ पृ. १२ परि. १]
४. गणना ३१:२७ या वचनावरून ख्रिश्चनांना काय उत्तेजन मिळते? [w०५ ४/१ पृ. २१]
५. इस्राएली लोकांसाठी करण्यात आलेल्या शरणपुरांच्या योजनेमुळे त्यांना कोणकोणत्या मार्गांनी फायदा झाला? (गण. ३५:११, १२) [w९५ ११/१५ पृ. १४ परि. १७]
६. समजदारी एक महत्त्वाचा ख्रिस्ती गुण आहे असे का म्हणता येईल व त्याचे फायदे काय? (अनु. १:१३) [w०३ १/१५ पृ. ३०; w०० १०/१ पृ. ३२ परि. १-३]
७. मोशेद्वारे दिलेल्या नियमशास्त्रात देवाचे नीतिमत्त्व कशा प्रकारे व्यक्त करण्यात आले होते? (अनु. ४:८) [w०२ ६/१ पृ. १४ परि. ८-पृ. १५ परि. ९-१०]
८. अनुवाद ६:१६-१८ यानुसार, यहोवाची परीक्षा पाहण्याचा योग्य व अयोग्य मार्ग कोणता याचे स्पष्टीकरण द्या. [w०४ ९/१५ पृ. २६ परि. ६]
९. यहोवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनांनी इस्राएल लोकांच्या गरजा कशा भागवण्यात आल्या आणि ही वचने आज आपल्यासाठी देखील पोषक का आहेत? (अनु. ८:३) [w९९ ८/१५ पृ. २५-२६]
१०. वैद्यकीय उपचारांत स्वतःच्या रक्ताचा वापर करण्याच्या बाबतीत निर्णय घेताना अनुवाद १२:१६, २४ ही वचने आपली कशी मदत करतात? [w०० १०/१५ पृ. ३० परि. ४]