वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०९ पृ. ५
  • योग्य लोकांना शोधा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योग्य लोकांना शोधा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्याकडे वैयक्‍तिक क्षेत्र आहे का?
    आमची राज्य सेवा—२००६
  • वैयक्‍तिक क्षेत्राचा फायदा
    आमची राज्य सेवा—२०१३
  • योग्य असलेल्यांना शोधणे
    आमची राज्य सेवा—२००३
  • व्यापारी क्षेत्रात प्रचार कसा करावा
    आमची राज्य सेवा—२००४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ९/०९ पृ. ५

योग्य लोकांना शोधा

१. सेवेत भाग घेण्याचा जो विशेषाधिकार आपल्याला मिळाला आहे त्याबद्दल आपण कदर कशी दाखवतो?

१ आपल्या सेवा कार्यादरम्यान नम्र लोकांपर्यत सांत्वनदायक सुवार्ता पोहचवण्यासाठी येशूने खूप मेहनत घेतली होती. (यश. ६१:१, २) ख्रिस्ताचे वकील व दूत यानात्याने आपल्यालाही त्याच्याप्रमाणे आपल्या क्षेत्रातील योग्य लोकांचा न थकता कसून शोध घेण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे.—मत्त. १०:११; २ करिंथ. ५:२०.

२. पौलाने कशा रितीने परिस्थितीनुसार आपल्या प्रचार कार्यात बदल केला व याचा काय परिणाम दिसून आला?

२ परिस्थितीनुसार बदल करा: प्रेषित पौल सर्वात प्रथम सभास्थानात जाऊन यहूदी व हेल्लेणी यांना प्रचार करत असे. (प्रे. कृत्ये १४:१) फिल्लिपैमध्ये त्याने व सीलाने, ‘जेथे प्रार्थना होत असते असे त्यांना वाटले तेथे जाऊन’ लोकांचा शोध घेतला. तिथे जमलेल्या स्त्रियांच्या गटाला त्यांनी प्रचार केला व त्यातली एक स्त्री लुदिया हिने लगेचच सत्याचा स्वीकार केला.—प्रे. कृत्ये १६:१२-१५.

३. घरोघरच्या प्रचार कार्याशिवाय आपल्यापुढे सेवेचे आणखी कोणते मार्ग आहेत?

३ घरोघरच्या सेवा कार्याव्यतिरिक्‍त तुम्ही देखील बसस्थानके, बागा, कंपन्या, रहदारी असलेल्या चौकांत, व्यापारी क्षेत्रांत व बाजारात लोकांना प्रचार करू शकता का? शिवाय तुम्ही कडक सुरक्षाव्यवस्था असलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्‍या लोकांना टेलिफोन व पत्राने साक्ष देऊ शकता. वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करताना आपण सावध व हुशार असले पाहिजे. आपल्या क्षेत्रात होणाऱ्‍या बदलांवर नजर ठेवल्याने व त्यानुसार जुळवून घेतल्याने “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक” कार्य तुम्हाला करता येईल.—१ करिंथ. १५:५८.

४. आपल्या मंडळीकडे जर मर्यादित क्षेत्र असेल तर आपल्यापुढे इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

४ अनेक प्रचारकांना आपली सेवा वाढवण्याची संधी मिळाली आहे. दुसऱ्‍या राज्यातून आलेल्या लोकांना साक्ष देता यावी म्हणून इतरांनी नवीन भाषा शिकून घेतली आहे.

५. आपण ज्या काळात जगत आहोत त्याबद्दल आपला काय दृष्टिकोन असला पाहिजे व आपण काय करण्याचे ठामपणे ठरवले पाहिजे?

५ आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की हे जग शेत आहे. (मत्त. ९:३७; १३:३८) या दुष्ट व्यवस्थिकरणाचा नाश जवळ आल्यामुळे आपण सर्वांनी स्वतःची परिस्थिती, क्षमता, आपल्यापुढे असणाऱ्‍या संधी व आपली सेवा वाढवण्याचे पर्याय यांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपण राज्यविषयक गोष्टींना प्रथमस्थानी ठेवल्यास सेवा वाढवण्याच्या आपल्या प्रयत्नांवर यहोवा आशीर्वाद देईल असे तो आपल्याला वचन देतो.—मत्त. ६:३३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा