वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०९ पृ. १
  • तुम्ही कसे उत्तर द्याल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही कसे उत्तर द्याल?
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • महान शिक्षकाचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—प्रश्‍नांचा प्रभावीपणे वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • देवाबद्दल तुम्हाला कितपत माहीत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • घरमालकाला तर्क करण्यास मदत करा
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ९/०९ पृ. १

तुम्ही कसे उत्तर द्याल?

१. आपल्याला प्रश्‍न विचारले जातात तेव्हा आपण येशूचे अनुकरण का केले पाहिजे?

१ येशूला विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांची त्याने ज्या प्रभावीपणे उत्तरे दिली त्याबद्दल मानवांना आजही खूप आश्‍चर्य वाटते. प्रचार कार्यात आपल्यालाही जेव्हा वेगवेगळे प्रश्‍न विचारण्यात येतात तेव्हा त्यांची उत्तरे देताना आपण येशूचे अनुकरण करतो.—१ पेत्र २:२१.

२. कोणती गोष्ट आपल्याला एखाद्या प्रश्‍नाचे प्रभावकारी उत्तर द्यायला मदत करू शकते?

२ पहिले ऐकून घ्या: प्रश्‍न विचारणारा का प्रश्‍न विचारत आहे हे येशू आधी समजून घ्यायचा. आपणही, ती व्यक्‍ती नक्की काय विचार करत आहे ते समजून घेण्यासाठी आणखी प्रश्‍न विचारले पाहिजेत. जर कोणी “तुमचा येशूवर विश्‍वास आहे का?” असा प्रश्‍न विचारत असेल तर कदाचित त्याला आपण नाताळ का साजरा करत नाही हे जाणून घ्यायचे असेल. जर प्रश्‍न विचारणाऱ्‍याचा मुख्य हेतू तुम्ही समजू शकला तर त्याच्यासोबत तुम्ही प्रभावीपणे तर्क करू शकता.—लूक १०:२५-३७.

३. बायबल आधारित समाधानकारक उत्तरे देण्यासाठी आपल्याकडे कोणती साधने उपलब्ध आहेत?

३ देवाच्या वचनातून उत्तर द्या: प्रश्‍न विचारले जातात तेव्हा बायबलमधून उत्तर देणे नेहमीच योग्य असते. (२ तीम. ३:१६, १७; इब्री ४:१२) रिझनींग पुस्तक व चर्चेसाठी बायबल विषय या पुस्तिकेचा योग्य उत्तर देण्यासाठी चांगला उपयोग होतो. प्रश्‍न विचारणारा जरी बायबलला मानत नसला तरी, बायबल काय शिकवते ते तुम्ही त्याला व्यवहार कुशलतेने सांगू शकता. सर्व काळांना लागू होणाऱ्‍या बायबलमधील बुद्धीच्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला त्या व्यक्‍तीला प्रोत्साहन द्या. येशूचे अनुकरण केल्याने तुमची उत्तरे “रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे,” अशी म्हणजे आदरणीय, सुरेख व मौल्यवान असतील.—नीति. २५:११.

४. विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे टाळणे कधी योग्य ठरते?

४ आपण प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर द्यावे का? जर तुम्हाला विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर माहीत नसेल तर,‘मला या प्रश्‍नाचे उत्तर माहीत नाही पण मी यावर संशोधन करेन व परत येऊन याचे उत्तर तुम्हाला देईन,’ असे म्हणायला लाजू नका. अशा प्रकारे नम्रपणा व वैयक्‍तिक आस्था दाखवल्याने कदाचित घरमालक तुम्हाला परत घरी बोलवेल. प्रश्‍न विचारणारा जर वाद घालायच्या हेतूने प्रश्‍न विचारत आहे असे तुमच्या लक्षात आले तर येशूप्रमाणे तुम्हीही थोडक्यात उत्तर द्या. (लूक २०:१-८) तसेच जर एखाद्याला सत्याबद्दल खरी आस्था नसेल व तो तुमच्याशी फक्‍त वाद घालत असेल तर नम्रपणे संभाषण थांबवा व इतर प्रामाणिक लोकांना शोधण्यासाठी तुमचा वेळ खर्च करा.—मत्त. ७:६.

५. प्रश्‍नांची उत्तरे देण्यात येशूने कोणता आदर्श मांडला आहे?

५ “सत्याविषयी साक्ष” देण्याची कामगिरी पूर्ण करण्यासाठी व खरोखरच उत्तर जाणून घ्यायच्या इच्छेने विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी यहोवावर विसंबून राहण्याची गरज आहे हे येशूला माहीत होते. (योहा. १८:३७) ‘सार्वकालिक जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असलेल्या सर्वांना’ योग्य उत्तर देताना येशूचे अनुकरण करण्याचा आपल्याला किती मोठा विशेषाधिकार मिळाला आहे!—प्रे. कृत्ये १३:४८, NW.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा