ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
ऑगस्ट ३१, २००९ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, जुलै ६ ते ऑगस्ट ३१, २००९ पर्यंतच्या सप्ताहांत जे सर्व भाग झाले त्यावर आधारित २० मिनिटांची उजळणी घेतील.
१. आईबापांना ‘शिव्याशाप देणाऱ्याला’ मृत्यूदंडाची शिक्षा का दिली जायची? (लेवी. २०:९) [w०४-MR ५/१५ पृ. २४ परि. ६]
२. आध्यात्मिक कार्यांना प्राधान्य देण्याचे महत्त्व देवाने इस्राएलांच्या मनांवर कशा प्रकारे ठसवले? (लेवी. २३:४-४४) [w०५ ६/१ पृ. १५ परि. १४]
३. योबेलवर्षाची व्यवस्था कशाची पूर्वझलक होती? (लेवी. २५:१०, ११) [w०४-MR ७/१५ पृ. २६-२७]
४. गणना २:२ यात उल्लेख केलेल्या ध्वजांचा इस्राएलांकरता धार्मिकदृष्ट्या काही विशेष अर्थ होता का? [w०२-MR ९/१५ पृ. २१ परि. ४]
५. पूर्ण वेळेचे राज्य प्रचारक आज प्राचीन काळच्या नाजीरांसारखी मनोवृत्ती कशा प्रकारे दाखवतात? (गण. ६:३, ५, ६) [w०४-MR ८/१ पृ. २४-२५]
६. लेव्यांच्या निवृत्तीसंबंधी असलेल्या नियमातील कोणते तत्त्व आज यहोवाच्या लोकांना लागू होऊ शकते? (गण. ८:२५, २६) [w०४-MR ८/१ पृ. २५ परि. १]
७. इस्राएल लोकांनी कशा प्रकारे स्वार्थी मनोवृत्ती दाखवली आणि ख्रिस्ती आज यातून काय शिकू शकतात? (गण. ११:४) [w०१-MR ६/१५ पृ. १४-१५; w९५-MR ३/१ पृ. १५ परि. १०]
८. फक्त मिर्यामच कोडी का बनली आणि यातून कोणता महत्त्वाचा धडा आपण शिकू शकतो? (गण. १२:९-११) [w०४-MR ८/१ पृ. २६ परि. २; it-२ पृ. ४१५ परि. १]
९. कालेबने व यहोशवाने कनानी लोकांना “भक्ष्य” म्हटले, ते कोणत्या अर्थाने? (गण. १४:९) [w०६-MR १०/१ पृ. १८ परि. ५]
१०. गणना २१:५ यात कोणते इशारेवजा उदाहरण सापडते? [w९९-MR ८/१५ पृ. २६-२७]