वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०९ पृ. ८-९
  • क्षेत्र सेवेच्या सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षेत्र सेवेच्या सभा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • उद्देश साध्य करणाऱ्‍या क्षेत्र सेवेच्या सभा
    आपली राज्य सेवा—२०१५
  • क्षेत्र सेवाकार्याच्या सभांचा पूर्ण फायदा घ्या
    आमची राज्य सेवा—२००६
  • तुमच्या क्षेत्र सेवेच्या गटापासून फायदा मिळवा
    आमची राज्य सेवा—२०१२
  • मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था भाग ३: क्षेत्र कार्याचे केंद्र
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ८/०९ पृ. ८-९

क्षेत्र सेवेच्या सभा

१. संघटित रित्या क्षेत्र सेवेत जाण्याची आपली इच्छा का आहे?

१ राज्य प्रचार कार्य सुसंघटीत व सुयोग्य पद्धतीने करण्याच्या बाबतीत येशूने उदाहरण मांडले आहे. त्याच्या प्रमाणे आजही जगभरातील राज्य प्रचार कार्याची मोहीम राबवणाऱ्‍यांची देखील मनापासून ही इच्छा आहे की हे कार्य अशाच पद्धतीने केले जावे. यासाठी जगभरातील मंडळ्यांमध्ये क्षेत्र सेवा करणाऱ्‍या राज्य प्रचारकांना संघटित करण्यासाठी क्षेत्र सेवेच्या सभा घेतल्या जातात.—मत्त. २४:४५-४७; २५:२१; लूक १०:१-७.

२. क्षेत्र सेवेची सभा कशी असायला हवी?

२ एक उत्तम व्यवस्था. साक्ष कार्य करणाऱ्‍यांना प्रोत्साहन, व्यावहारीक सूचना व मार्गदर्शन देण्यासाठी क्षेत्र सेवेची सभा घेतली जाते. क्षेत्र सेवेसाठी लागू होणाऱ्‍या दैनिक वचनाची संक्षिप्तपणे चर्चा केली जाऊ शकते. सेवेसाठी आलेल्या बंधू भगिनींना सेवेसाठी तयार करण्यासाठी त्यांच्याबरोबर आमची राज्य सेवा, रिझनींग व सेवा प्रशाला पुस्तक यातील सूचनांवर चर्चा केली जाऊ शकते. जी प्रकाशने क्षेत्रात सादर केली जाणार आहेत त्यांबद्दल एखादे छोटे प्रात्यक्षिक दाखवले जाऊ शकते. समाप्तीची प्रार्थना करण्याआधी सर्वांना ते कोणासोबत व कोणत्या क्षेत्रात काम करणार आहेत हे माहीत असले पाहिजे. १५ मिनिटांच्या या सभेनंतर सर्वांनी आपापल्या क्षेत्रात जावे.

३. क्षेत्र सेवा सभेचे आयोजन करणे कोणाची जबाबदारी आहे?

३ क्षेत्र सेवेच्या सभा कशा आयोजित केल्या जातात? सेवा पर्यवेक्षक क्षेत्र सेवेच्या सभांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतात. गट पर्यवेक्षक किंवा त्यांना साहाय्य करणाऱ्‍या बंधूने शनिवार-रविवारी क्षेत्र सेवा सभेसाठी उपस्थित राहिले पाहिजे. काही पर्यवेक्षक व सेवा सेवक आठवड्याच्या इतर दिवशी सेवा गटासोबत कार्य करू शकतात. शनिवार-रविवारी घरोघरचे साक्ष कार्य करताना पुरेसे क्षेत्र असावे म्हणून गट पर्यवेक्षक, सेवा पर्यवेक्षकांच्या नेहमी संपर्कात राहतात. आठवड्यादरम्यान गटाला क्षेत्र सेवेत घेऊन जाणाऱ्‍यांवर सेवा पर्यवेक्षक देखरेख करतील.

४-६. (क) मंडळीच्या क्षेत्राच्या बाबतीत क्षेत्र सेवा सभा घेण्यामागचा आपला उद्देश काय आहे? (ख) क्षेत्र सेवा सभेची गरज लक्षात घेता कशाचा विचार केला पाहिजे?

४ सभा कोठे व कधी भरवायच्या? मंडळीच्या क्षेत्रात प्रभावीपणे काम करण्यासाठी, संपूर्ण मंडळीला एका ठिकाणी बोलावण्यापेक्षा या सभा सोईस्कर ठिकाणी, जसे की त्या क्षेत्रातील एखाद्या बांधवाच्या घरी भरवणे योग्य राहिल. यासाठी राज्य सभागृहाचाही वापर केला जाऊ शकतो. अनेक मंडळ्या रविवारी जाहीर भाषण व टेहळणी बुरूज अभ्यासानंतर राज्य सभागृहातच क्षेत्र सेवा सभा घेतात. क्षेत्रात जाण्याचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. प्रभावीपणे व पूर्णपणे क्षेत्र उरकले जावे म्हणून सध्या ज्या ठिकाणी क्षेत्र सेवेच्या सभा घेतल्या जातात त्या उचित आहेत किंवा नाही हे वेळोवेळी पाहण्याची व्यवस्था करावी.

५ या सभेसाठी कोणती वेळ योग्य राहील व आठवड्यादरम्यान किती वेळा व कोणत्या दिवशी या सभा घेतल्या पाहिजेत हे क्षेत्र कसे आहे यावर अवलंबून आहे. क्षेत्र सेवा सभा कोठे व कधी घेतल्या जाव्यात हे ठरवायला खालील प्रश्‍न तुम्हाला साहाय्य करतील.

६ कोणत्या क्षेत्राकडे लक्ष देणे गरजेचे आहे? घरोघरचे प्रचार कार्य करण्याची उत्तम वेळ कोणती आहे? घरोघरचे सेवा कार्य किंवा पुर्नभेटी यांच्यासाठी सायंकाळची वेळ ठरवावी का? मंडळीच्या माहिती फलकावर क्षेत्र सेवे संबंधीच्या सर्व व्यवस्थेची माहिती लावावी. सर्व राज्य प्रचारकांची हीच इच्छा आहे की त्यांना नेमून दिलेले क्षेत्र त्यांनी अशा रितीने पूर्ण करावे जेणेकरून आपणही प्रेषित पौलासारखे, ‘मी प्रचार केले नाही असे एकही ठिकाण राहिले नाही’ असे म्हणू शकू.—रोम. १५:२३.

७. क्षेत्रात सेवा गट घेऊन जाणाऱ्‍यावर कोणती जबाबदारी आहे?

७ क्षेत्र सेवेच्या सभा घेताना: ही सभा घेण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलेला बांधव सभेची चांगली तयारी करण्याद्वारे या ईश्‍वरशासित व्यवस्थेबद्दल त्याला गहिरा आदर असल्याचे दाखवतो. ही सभा वेळेवर सुरू झाली पाहिजे व १० ते १५ मिनिटांच्यावर ती असू नये. ती माहितीप्रद व संक्षिप्त असावी. सभेपूर्वी ती घेणाऱ्‍याकडे गटासाठी क्षेत्र असले पाहिजे. क्षेत्र सेवा सभा संपल्यानंतर उशीरा येणाऱ्‍यांसाठी थांबायची गरज नाही, गट कोठे काम करणार आहे याबद्दल निरोप ठेवणे पुरेसे आहे. सभा संपल्यानंतर सगळ्यांनी लगेचच क्षेत्रात गेले पाहिजे. त्या दिवशी क्षेत्र सेवेसाठी आलेल्या सर्वांना सुसंघटित व माहितीप्रद क्षेत्र सेवा सभेमुळे योग्य मार्गदर्शन मिळेल हे नक्की!—नीति. ११:१४.

८. क्षेत्र सेवा सभेला उपस्थित राहणारे, नेतृत्व करणाऱ्‍या बांधवाला कशा प्रकारे सहकार्य करू शकतात?

८ क्षेत्र सेवा सभेला उपस्थित राहाणे: सभेसाठी सहकार्याची गरज आहे. (इब्री १३:१७) गटाचे नेतृत्व करणारा बांधव शक्य असते तेव्हा, गटात ज्याला जोडीची गरज असेल त्याच्याबरोबर सेवा करून त्याला मदत करेल. कमी अनुभव असणाऱ्‍या किंवा नवीन प्रचारकांना मदत करण्याकरता अनुभवी प्रचारक सभेला उपस्थित राहिल्यास बरे होईल. अधूनमधून काही बंधू भगिनी इतरांबरोबर सेवा करण्यास तयार असतील. यामुळे खरोखरच चांगले परिणाम मिळतील. (नीति. २७:१७; रोम. १५:१, २) सर्वांनी वेळेवर यायचा प्रयत्न केला पाहिजे. या ईश्‍वरशासित व्यवस्थेबद्दल आपल्याला असलेला आदर व आपल्या बंधू भगिनींबद्दल असलेल्या काळजीमुळे आपण याबाबतीत आवश्‍यक ते बदल करण्यास तयार असू.—२ करिंथ. ६:३, ४; फिलिप्पै. २:४.

९. या व्यवस्थेला पायनियर कोणत्या मौल्यवान पद्धतीने आधार देऊ शकतात?

९ पायनियरांचा आधार: क्षेत्र सेवा सभेतील पायनियरांचा आधार खूप मौल्यवान व प्रोत्साहन दायक असतो. पायनियरांना खूप जबाबदाऱ्‍या असतात हे आपण समजू शकतो. बायबल अभ्यास चालवणे, पुर्नभेटी घेणे यांव्यतिरिक्‍त त्यांना त्यांची नोकरी संभाळावी लागते व त्यांच्या कुटुंबाची काळजीही घ्यावी लागते. त्यामुळे मंडळीत जर दररोजच क्षेत्र सेवेच्या सभा असतील तर आपण प्रत्येक सभेला हजर राहिले पाहिजे असा पायनियरांनी विचार करायची गरज नाही. पण प्रत्येक आठवड्याच्या निदान काही क्षेत्र सेवेच्या सभांना ते उपस्थित राहू शकतात. क्षेत्र सेवा सभांमध्ये मंडळीतील बंधू भगिनींना प्रशिक्षण दिले जाते व पायनियरांना असलेले बायबलचे ज्ञान व त्यांचा अनुभव इतरांना मदतदायी ठरू शकतो. सतत प्रचार कार्यात भाग घेत असल्यामुळे त्यांना सेवेचा चांगला अनुभव असतो. ते आपला अनुभव इतरांना सांगू शकतात. सेवेत व क्षेत्र सेवा सभेतील त्यांच्या आवेशी सहभागामुळे ते अनुकरणीय उदाहरण आहेत. आणि क्षेत्र सेवा सभेतील त्यांचा सहभाग खरोखरच कौतुकास्पद आहे.

१०. या व्यवस्थेला सर्व राज्य प्रचारकांनी पूर्ण मनाने पाठिंबा का दिला पाहिजे?

१० येशू व त्याच्या शिष्यांप्रमाणे आपणही घरोघरचे प्रचार कार्य करून राज्य प्रचाराचे बहुतेक कार्य उरकतो. क्षेत्र सेवेच्या सभा एकमेकांना उत्तेजन देण्याकरता व प्रभावीपणे साक्ष कार्य करण्याकरता ठेवल्या जातात. सुवार्तेच्या सर्व प्रचारकांनी अशा ईश्‍वरशासित व्यवस्थेला होता होईल तितका पाठिंबा दिला पाहिजे. (प्रे. कृत्ये ५:४२; २०:२०) क्षेत्र सेवा सभेला पाठिंबा देण्याकरता आपल्याला काही फेरबदल करावा लागला तर आपण त्यासाठी तयार असले पाहिजे. असे केल्याने आपल्याला यहोवाचे समृद्ध आशीर्वाद मिळतील व देवाच्या राज्याचा प्रचार केल्यामुळे आपला नेता येशू ख्रिस्त याचे हृदय आपण आनंदित करू शकू.—मत्त. २५:३४-४०; २८:१९, २०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा