ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
खालील प्रश्नांची चर्चा ईश्वरशासित सेवा प्रशालेत केली जाईल.
१. निर्गम २३:१९ यात जी मनाई करण्यात आली आहे त्यावरून आपण काय शिकू शकतो? [w०६-MR ४/१ पृ. ३१ परि. १-५]
२. उरीम व थुम्मीम काय होते आणि प्राचीन इस्राएलात त्यांचा कशासाठी वापर केला जात असे? (निर्ग. २८:३०) [w०६-MR १/१५ पृ. १८; w०१-MR ९/१ पृ. २७]
३. यहोवा मोशेशी “समोरासमोर” कसा बोलला? (निर्ग. ३३:११, २०) [w०४-MR ३/१५ पृ. २७]
४. निवासमंडपाच्या बांधकामासाठी इस्राएल लोकांनी उदारतेने साहित्य दिले व या कार्यात स्वतःच्या कौशल्यांचाही उपयोग केला यावरून आपण काय शिकू शकतो? (निर्ग. ३५:५, १०) [w९९-MR ११/१ पृ. ३१ परि. १-२]
५. निर्गम ४०:२८ यात ज्या पडद्याचा उल्लेख केला आहे तो देवाच्या महान आत्मिक मंदिरात कशास सूचित करतो? [w००-MR १/१५ पृ. १५ परि. ७-८]
६. ‘होमार्पणात’ संपूर्ण पशू देवाला अर्पण केला जाई, ही गोष्ट येशूच्या बलिदानाच्या कोणत्या पैलूस सूचित करते? (लेवी. १:१३) [w०४-MR ५/१५ पृ. २१ परि. ३]
७. “चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे” या शब्दांवरून आपल्याला काय समजते? (लेवी. ३:१६, १७) [w०४-MR ५/१५ पृ. २२ परि. २]
८. वेदीच्या पायथ्याशी रक्त ओतण्याचे व विविध वस्तूंवर ते लावण्याचे महत्त्व काय होते? (लेवी. ९:९) [w०४-MR ५/१५ पृ. २२ परि. ५]
९. लेवीय १२:८ यातून येशूच्या आईवडिलांबद्दल आपल्याला कोणती माहिती मिळते आणि यावरून आपण काय शिकू शकतो? [w९८-MR १२/१५ पृ. ६ परि. ५]
१०. येशूच्या खंडणी बलिदानाचे फायदे वार्षिक प्रायश्चित्त दिनाच्या माध्यमाने कशा प्रकारे दाखवण्यात आले? (लेवी. १६:११-१६) [w९८-MR २/१५ पृ. १२ परि. २]