प्रचार कार्य केल्याने आपण आध्यात्मिक रीत्या मजबूत होतो
१. प्रचार कार्य केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात?
१ प्रचार कार्यात उत्साहाने सहभाग घेतल्याने यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आणखी मजबूत होतो आणि आपण अधिक आनंदी बनतो. खरे तर, यहोवाला आनंदी करण्याची आपली इच्छा असल्यामुळेच आपण प्रचार कार्यात भाग घेतो. पण, ‘वचनाची घोषणा करण्याच्या’ आज्ञेचे पालन केल्याने आपल्याला यहोवाकडून अनेक आशीर्वाद लाभतात. तसेच, इतर मार्गांनीही ते आपल्या हिताचे ठरते. (२ तीम. ४:२; यश. ४८:१७, १८) प्रचार कार्यामुळे आपण आध्यात्मिक रीत्या दृढ व आनंदी कसे होऊ शकतो?
२. सेवाकार्य कशा प्रकारे आपल्याला मजबूत बनवते?
२ आपण मजबूत होतो व आपल्याला आशीर्वाद मिळतात: प्रचार कार्यात सहभाग घेतल्याने आपण आपले लक्ष सध्याच्या समस्यांवर नव्हे तर देवाच्या राज्याकरवी मिळणाऱ्या आशीर्वादांवर केंद्रित करतो. (२ करिंथ. ४:१८) इतरांना बायबल शिकवल्याने यहोवाच्या अभिवचनांवरील आपला विश्वास आणखी मजबूत होतो व सत्याबद्दल आपली गुणग्राहकता वाढते. (यश. ६५:१३, १४) इतरांनी, ‘जगाचा भाग’ होऊ नये म्हणून यहोवासोबत नातेसंबंध जोपासण्यासाठी आपण त्यांना मदत करतो तेव्हा जगाचा भाग न होण्याचा आपला स्वतःचा संकल्प देखील आणखी दृढ होतो.—योहा. १७:१४, १६; रोम. १२:२.
३. आपल्या सेवाकार्यामुळे आपल्यामध्ये कोणकोणते ख्रिस्ती गुण विकसित होतात?
३ सेवाकार्य केल्याने आपल्यामध्ये ख्रिस्ती गुण विकसित होतात. उदाहरणार्थ, आपण ‘सर्वांसाठी सर्व काही होण्याचा’ प्रयत्न करतो तेव्हा अधिक नम्र बनतो. (१ करिंथ. ९:१९-२३) ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे गांजलेल्या व पांगलेल्या’ लोकांशी आपण बोलतो तेव्हा इतरांबद्दल सहानुभूती दाखवण्यास आपण प्रेरित होतो. (मत्त. ९:३६) लोकांनी आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष केले किंवा आपला विरोध केला तरीही हार न मानता प्रचार कार्य करत राहिल्याने आपण सहनशील असण्यास शिकतो. इतरांना मदत करण्यासाठी आपले जीवन खर्च केल्यामुळे आपला आनंद द्विगुणित होतो.—प्रे. कृत्ये २०:३५.
४. तुमच्या सेवाकार्याबद्दल तुम्हाला कसे वाटते?
४ आपल्या सेवाकार्याद्वारे, आपल्या उपासनेस योग्य असलेल्या एकमेव देवाची स्तुती होते. तेव्हा या सेवाकार्यात सहभाग घेणे हा आपल्यासाठी किती मोठा विशेषाधिकार आहे! आपल्या सेवाकार्यामुळे आपण मजबूत होतो. आणि “सुवार्तेची अगदी पूर्णपणे साक्ष” देण्यात आपण स्वतःला झोकून देतो तेव्हा आपल्याला विपुल आशीर्वाद मिळतात.—प्रे. कृत्ये २०:२४ NW.