मार्च ९ च्या सप्ताहाचा आराखडा
मार्च ९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १ (१३)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ६१
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: उत्पत्ति ४०-४२
क्र. १: उत्पत्ति ४०:१-१५
क्र. २: लग्नसमारंभाच्याही पुढे पाहणे (fy-MR पृ. २५, २६ परि. २२, २३)
क्र. ३: स्वैराचारी वृत्तीपासून सांभाळून राहा!
❑ सेवा सभा:
गीत ६ (४५)
५ मि.: घोषणा. नियतकालिके कशी सादर करण्यात आली व घरमालकाने कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली याविषयी प्रचारकांना एक किंवा दोन अनुभव थोडक्यात विचारा.
१५ मि.: इतर जण स्पष्टीकरण विचारतात तेव्हा. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठ १७७ वरील उपशीर्षकावर आधारित भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा. कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत आपल्या ख्रिस्ती विश्वासांविषयी प्रश्न विचारणाऱ्यांना एक प्रचारक कसे उत्तर देतो याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. प्रचारक विचारलेल्या प्रश्नाचे “सौम्यतेने व भीडस्तपणाने” उत्तर देतो.—१ पेत्र ३:१५.
१५ मि.: “स्मारक विधीची तयारी करण्यात कोणतीच कसूर करू नका.” भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा. स्मारक विधीसाठी मंडळीने काय व्यवस्था केली आहे ते थोडक्यात सांगा.
गीत २१ (१९१)