ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
फेब्रुवारी २३, २००९ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, जानेवारी ५ ते फेब्रुवारी २३, २००९ पर्यंतच्या सप्ताहांत जे सर्व भाग झाले त्यावर आधारित २० मिनिटांची उजळणी घेतील.
१. चवथ्या दिवसापर्यंत सूर्यचंद्रादि तेजस्वी गोल निर्माण केले नसताना पहिल्या दिवशी देवाने प्रकाश कसा उत्पन्न केला? (उत्प. १:३, १६) [w०४-MR १/१ पृ. २८ परि. ५]
२. कोणत्या अर्थी मानवाला उत्पन्न केल्याचा यहोवाला “अनुताप” झाला?” (उत्प. ६:६) [w०४-MR १/१ पृ. २९]
३. नोहाने कनानला शाप का दिला? (उत्प. ९:२०-२५) [w०४-MR १/१ पृ. ३१ परि. २]
४. अब्राहामासोबत केलेला करार केव्हापासून अंमलात आला आणि किती काळापर्यंत? (उत्प. १२:१-४) [w०४-MR १/१५ पृ. २६ परि. ४; w०१-MR ८/१५ पृ. १७ परि. १३]
५. निम्रोद व त्याच्या अनुयायांना ‘स्वतःचे नाव करण्यात’ अपयश का आले? (उत्प. ११:४) [w९८-MR ३/१५ पृ. २५]
६. लोटाला २ पेत्र २:७ मध्ये “नीतिमान” मनुष्य म्हटले आहे, मग त्याने संतप्त जमावाला आपल्या मुली का देऊ केल्या असाव्यात? (उत्प. १९:८) [w०५-MR २/१ पृ. २६ परि. १५-१६; w०४-MR १/१५ पृ. २७ परि. ३]
७. इसहाकासाठी बायको शोधण्यात अलियेजरने यहोवाच्या मार्गदर्शनानुसार घेतलेल्या मेहनतीवरून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? (उत्प. २४:१४, १५, १७-१९, २६, २७) [w९७-MR १/१ पृ. ३१ परि. २]
८. स्वप्नात याकोबाने ‘देवदूतांना शिडीवरून चढत-उतरत’ असल्याचे जे पाहिजे त्याचा काय अर्थ होतो? (उत्प. २८:१०-१३) [w०३-MR १०/१५ पृ. २९ परि. १; it-२ पृ. १८९]
९. लेआच्या मुलाकडून पुत्रदात्रीची फळे मिळवण्याकरता राहेल अधिक उत्सुक का होती? (उत्प. ३०:१४, १५) [w०४-MR १/१५ पृ. २८ परि. ७]
१०. याकोबाला “संकटात” घालणाऱ्या समस्येची नेमकी सुरुवात कशी झाली होती? (उत्प. ३४:१, ३०) [w०४-MR १/१५ पृ. २८ परि. १०]