वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०९ पृ. १-२
  • ते कसे ऐकतील?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ते कसे ऐकतील?
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • सुवार्तेची घोषणा करण्यात ढिलाई नाही
    आमची राज्य सेवा—१९९६
  • आमचे सेवकपण खंड पडू न देता पुढे चालू ठेवणे
    आमची राज्य सेवा—१९९०
  • आपण वारंवार लोकांकडे का जातो?
    आमची राज्य सेवा—२००७
  • राज्याचा प्रचार करीत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km १/०९ पृ. १-२

ते कसे ऐकतील?

१. प्रचार कार्य कधीकधी कठीण का असू शकते व तरीपण आपण ते का करत राहतो?

१ यहोवाचा दिवस खूप तेजीने जवळ येत आहे. त्यामुळे, देवाविषयीचे आणि त्याच्या उद्देशांविषयीचे खरे ज्ञान घेण्यास असंख्य लोकांना मदत करण्याची निकडीची गरज आहे. (योहा. १७:३; २ पेत्र ३:९, १०) हे कधीकधी कठीण असू शकते. कारण पुष्कळ लोकांना आपला संदेश ऐकण्यात आवड नाही किंवा आपण प्रचार कार्य करतो म्हणून ते आपली थट्टा करतील. (२ पेत्र ३:३, ४) तरीपण आपल्या क्षेत्रात असे अनेक लोक आहेत जे आपला संदेश ऐकल्यावर तो स्वीकारतील अशी आपल्याला खात्री आहे. पण मग त्यांना कोणी प्रचार केलाच नाही तर ते तो संदेश कसा ऐकतील?—रोम. १०:१४, १५.

२. पौलाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

२ विरोध होत असतानाही: अजून पुष्कळ लोक राज्य संदेश ऐकू इच्छित आहेत त्यामुळे आपल्याला हार मानून चालणार नाही. युरोपातील फिलिप्पै हे पहिले शहर होते जेथे प्रेषित पौलाने सुवार्तेची घोषणा केली. तेथील लोकांनी पौलावर व सीलावर खोटे आरोप लावून त्यांना फटके मारले व तुरुंगात डांबले. (प्रे. कृत्ये १६:१६-२४) पण या अनुभवामुळे पौल घाबरून जाऊन गप्प बसला नाही. त्याच्या मिशनरी दौऱ्‍यादरम्यान तो जेव्हा पुढील शहरात म्हणजे थेस्सलोनिकात गेला तेव्हा तेथे त्याने ‘देवाकडून शक्‍ती मिळाल्यामुळे धैर्य एकवटून’ सुवार्ता सांगितली. (१ थेस्सलनी. २:२) आपणही ‘खचू नये’ हे पौलाच्या उदाहरणावरून शिकतो.—गलती. ६:९.

३. अनेक वर्षांपर्यंत आपल्या संदेशात आवड न दाखवणारे लोक, कोणकोणत्या कारणांमुळे आता कदाचित बदलतील?

३ अनेक वर्षांपर्यंत आपल्या संदेशात आवड दाखवली नाही असे बरेच लोक आता बदलत आहेत. आर्थिक उलथापालथ, आजारपण, कुटुंबातल्या सदस्याचा मृत्यू किंवा मन सुन्‍न करणाऱ्‍या जगातील घटना, यामुळे अनेक लोकांत बदल होत आहेत. (१ करिंथ. ७:३१) विरोध करणाऱ्‍या काही पालकांची मुले आता मोठी झाली आहेत व ती आता संदेशात आवड घेत आहेत. आपण प्रचार कार्य करायचे थांबवत नसल्यामुळे अशा लोकांना, उशीर होण्याआधी ‘यहोवाच्या नावाचा धावा’ करण्याची संधी मिळते.—रोम. १०:१३, NW.

४. कोणत्या कारणामुळे आपण प्रचार करण्याचे व शिष्य बनवण्याचे कार्य ‘सोडत नाही’?

४ प्रचार कार्य करण्याचे ‘सोडू नये’: पहिल्या शतकातील प्रेषितांप्रमाणे आपण, देवावर आणि शेजाऱ्‍यांवर प्रेम करत असल्यामुळे, प्रचार व शिष्य बनवण्याचे कार्य ‘सोडत नाही.’ (प्रे. कृत्ये ५:४२) आज पुष्कळ लोक जगात होत असलेल्या “अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत.” (यहे. ९:४) असे लोक जेव्हा सुवार्ता ऐकतात तेव्हा त्यांना किती मोठी आशा व दिलासा मिळतो. आणि लोक आपला संदेश ऐकू इच्छित नसले तरीसुद्धा आपण प्रचार कार्य करत राहतो तेव्हा, यहोवा आपले प्रयत्न पाहून संतुष्ट होतो, असे आश्‍वासन शास्त्रवचनांत दिले आहे.—इब्री १३:१५, १६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा