वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०९ पृ. २
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००९
आमची राज्य सेवा—२००९
km १/०९ पृ. २

घोषणा

▪ साहित्य सादरता जानेवारी: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकाकडे हे पुस्तक आधीच असेल तर प्रचारक पिवळ्या पडणाऱ्‍या कागदावर छापण्यात आलेले किंवा १९९२ सालाआधी छापण्यात आलेले कोणतेही १९२ पानी पुस्तक सादर करू शकतात. फेब्रुवारी: पुढील कोणतेही पुस्तक सादर करा: तुमची काळजी करणारा निर्माणकर्ता आहे का? (इंग्रजी), कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य, किंवा बायबल—देवाचे पुस्तक की मानवाचे? (इंग्रजी). मार्च: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज नियतकालिके. स्मारकविधी आणि/किंवा इतर ईश्‍वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्‍या परंतु मंडळीसोबत सक्रिय नसलेल्या आस्थेवाईक लोकांना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक देण्याचा प्रयत्न करा. या पुस्तकातून गृह बायबल अभ्यास सुरू करा.

▪ मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून, विभागीय पर्यवेक्षकांच्या नव्या जाहीर भाषणाचा विषय, “जगिक स्वप्नांकडे पाठ फिरवा आणि देवराज्याशी संबंधित वास्तविक ध्येयांचा पाठलाग करा,” हा असेल.

▪ या वर्षीच्या गुरुवार, एप्रिल ९ रोजी सूर्यास्तानंतर स्मारक विधीकरता मंडळ्यांनी चांगल्या सुयोग्य व्यवस्था कराव्यात. प्रत्येक मंडळीने आपापला स्मारक विधी साजरा करावा. जेथे अनेक मंडळ्या सहसा एकच राज्य सभागृह वापरतात तेथे एक किंवा अनेक मंडळ्या त्या संध्याकाळपुरते दुसरे एखादे सभागृह वापरण्याची व्यवस्था करू शकतात. एकाच सभागृहात होणाऱ्‍या स्मारक विधीच्या दोन कार्यक्रमांदरम्यान कमीत कमी ४० मिनिटांचे अंतर ठेवावे असे आम्ही सुचवू इच्छितो; यामुळे सर्वांना त्या प्रसंगाचा पुरेपूर लाभ घेता येईल.

▪ जानेवारी २६ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहाच्या सेवा सभेत, नो ब्लड—मेडिसीन मीट्‌स द चॅलेंज या व्हिडिओवर चर्चा केली जाईल. तेव्हा, त्याआधी हा व्हिडिओ पाहण्याची बांधवांना आठवण करून द्या.

▪ मंडळीच्या बायबल अभ्यासासाठी, बायबल कथांचं माझं पुस्तक या पुस्तकाची तुम्ही तयारी कराल तेव्हा सर्वांनी, अतिरिक्‍त प्रश्‍नांसोबत दिलेली शास्त्रवचनेही वाचावीत. या सूचनेचे सर्वांनी पालन करावे असे आम्ही प्रोत्साहन देत आहोत. यामुळे, मंडळीचा बायबल अभ्यास ठरलेल्या वेळेत समाप्त होऊ शकतो.

▪ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

“आपणांस देवाच्या प्रीतीमध्ये राखा” —इंग्रजी

तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे, खंड २ —इंग्रजी

▪ उपलब्ध असलेल्या नवीन डिव्हीडी:

थोर शिक्षकाकडून शिका —अमेरिकन संकेत भाषा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा