सन २००९ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा
सूचना
सन २००९ मध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला पुढील व्यवस्थेनुसार चालवली जाईल.
मूळ साहित्य: द होली बायबल मराठी—आर. व्ही. [bsi], टेहळणी बुरूज [w-MR], कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य [fy-MR] आणि सावध राहा! [g-MR].
प्रशालेची सुरुवात स्वागतपर शब्दांनी वेळेवर झाली पाहिजे व ती पुढीलप्रमाणे व्हावी. प्रत्येक भागानंतर प्रशाला पर्यवेक्षक पुढील भागाचा परिचय करून देतील.
बायबल वाचनातील ठळक मुद्दे: १० मिनिटे. सुरुवातीची चार मिनिटे, एखाद्या योग्यताप्राप्त वडिलांनी अथवा सेवा सेवकांनी, दिलेले साहित्य मंडळीला फायदा होईल अशाप्रकारे प्रभावीपणे लागू केले पाहिजे. फक्त जेव्हा बायबल वाचन, बायबलमधील पुस्तकाच्या पहिल्या अध्यायापासून सुरु होते तेव्हा मात्र, पहिल्या चार मिनिटांमध्ये, २००४ सालच्या टेहळणी बुरूजच्या जानेवारी १ अंकापासून सुरु झालेल्या “यहोवाचे वचन सजीव आहे,” या शृंखलेतल्या माहितीचा उपयोग करावा. उदाहरणार्थ, जानेवारी ५ ने सुरु होणाऱ्या आठवड्यात उत्पत्तिच्या पहिल्या पाच अध्यायांची चर्चा केली जाणार आहे. तेव्हा वक्त्याने, टेहळणी बुरूज यामधील “यहोवाचे वचन सजीव आहे,” या शृंखलेत उत्पत्ति पुस्तकावर आलेल्या माहितीतून सुरुवातीच्या परिच्छेदांतले मुख्य मुद्दे निवडावेत. मंडळीतल्या सर्वांचा फायदा होईल अशाप्रकारे त्याने ही माहिती लागू करावी. साप्ताहिक बायबल वाचनातील मुद्द्यांची चर्चा असो अथवा टेहळणी बुरुज यामधील मुद्द्यांची चर्चा असो, मुख्य हेतू, अमूक माहिती का महत्त्वाची आहे व कशी, हे समजण्यास मदत करणे हा आहे. प्रस्तावनेसाठी वक्त्याने त्याला दिलेल्या चार मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेऊ नये. साप्ताहिक बायबल वाचनातून श्रोत्यांना समजलेल्या गोष्टींवर ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेची संक्षिप्त टिप्पणी करण्याकरता सहा मिनिटे आहेत, ही गोष्ट त्याने विसरू नये. यानंतर मग प्रशाला पर्यवेक्षक, इतर वर्गात नेमलेल्या विद्यार्थ्यांना आपापले भाग सादर करण्याकरता जायला सांगू शकतात.
नेमणूक क्रमांक १: ४ मिनिटे किंवा कमी. वाचनाची ही नेमणूक बांधवाला दिली जावी. नेमलेला भाग, प्रस्तावना किंवा समारोप न देताच विद्यार्थ्याने वाचावा. प्रशाला पर्यवेक्षक खासकरून पुढील रीतीने विद्यार्थ्यांना मदत करतील; जसे की वाचताना नेमलेल्या भागाचा अर्थ समजून घेणे, अस्खलितपणे वाचणे, उचित ठिकाणी जोर देऊन वाचणे, आवाजात योग्य चढउतार करून वाचणे, वाचताना उचित ठिकाणी थांबणे आणि सहजपणे वाचणे.
नेमणूक क्रमांक २: ५ मिनिटे. ही नेमणूक भगिनीला नेमून देण्यात येईल. ही नेमणूक मिळालेल्या भगिनींसाठी, प्रशाला पर्यवेक्षक स्वतः एखादे दृश्य निवडतील अथवा सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ ८२ वरील यादीतील एखादे दृश्य त्यांना नेमले जाईल. विद्यार्थीनीने, नेमलेला विषय वापरावा आणि तो विषय, स्थानीक क्षेत्रात वास्तविक आणि व्यावहारिक ठरेल अशा क्षेत्र सेवेतील एखाद्या पैलूला लागू करावा. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थीनीला तिच्या भाषणासाठी आपल्या प्रकाशनांतून संशोधन करून माहिती गोळा करावी लागेल. प्रशाला पर्यवेक्षक खासकरून, विद्यार्थीनी साहित्य कशा प्रकारे मांडते आणि घरमालकाला शास्त्रवचनांवर तर्क करायला तसेच सादरतेतील मुख्य मुद्दे समजायला कशा प्रकारे मदत करते ते पाहतील. प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थिनीला एक साहाय्यकही नेमतील.
नेमणूक क्रमांक ३: ५ मिनिटे. हा भाग एखाद्या बांधवाला अथवा बहिणीला नेमला जाऊ शकतो. दिलेल्या विषयावर विद्यार्थ्याने भाषण तयार करावे. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला आपल्या भाषणासाठी आपल्या प्रकाशनांतून संशोधन करून माहिती गोळा करावी लागेल. हा भाग एखाद्या बांधवाला नेमला जातो तेव्हा तो, राज्य सभागृहातील श्रोत्यांना उद्देशून भाषणाच्या रूपात सादर करता येईल. एखाद्या भगिनीला हा भाग नेमल्यास तिने तो नेमणूक क्रमांक २ च्या पद्धतीनेच सादर करावा. कृपया चौफुली चिन्ह असलेले विषय, केवळ बांधवांना नेमले जावेत व ते भाषण-रूपात सादर केले जावेत याची नोंद घ्या. उचित असते तेव्हा एखाद्या वडिलाला अथवा सेवा सेवकाला हा भाग नेमावा.
सल्ला: १-२ मिनिट. प्रशाला पर्यवेक्षकाने विद्यार्थी ज्या भाषण गुणावर काम करत आहे त्याविषयी आगाऊ सांगू नये. नेमणूक क्र. १, क्र. २ आणि क्र. ३ हाताळल्यानंतर, प्रशाला पर्यवेक्षक एखाद्या प्रशंसनीय मुद्द्यावर सकारात्मक अभिप्राय देतील. प्रशाला पर्यवेक्षकांचा हेतू “भाषण खूप चांगले होते,” फक्त असे म्हणण्याचा नसून विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणातील तो पैलू प्रभावी असण्यामागच्या विशिष्ट कारणांकडे लक्ष आकर्षित करणे हा असेल. ते वेळोवेळी सेवा प्रशाला पुस्तकाचाही संदर्भ घेतील. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, सभा संपल्यावर किंवा इतर वेळी खासगीत अतिरिक्त सकारात्मक सल्ला दिला जाऊ शकतो.
वेळ: कोणतेही भाषण किंवा सल्लागाराचे शेरे ओव्हरटाईम जाऊ नयेत. नेमणूक क्रमांक १, २ आणि ३, वेळ पूर्ण होते तेव्हा विचारशीलपणे थांबवले पाहिजेत. बायबल वाचनातील ठळक मुद्दे सादर करणारे बांधव जादा वेळ घेत असतील तर त्यांना खासगीत सल्ला द्यावा. प्रशालेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या वेळेकडे विशेष लक्ष द्यावे. कार्यक्रमाची एकूण वेळ: ३० मिनिटे.
काऊंसल फॉर्म: सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकात देण्यात आला आहे.
साहाय्यक सल्लागार: प्रशाला पर्यवेक्षकांच्या व्यतिरिक्त आणखी एखादे योग्यताप्राप्त वडील उपलब्ध असल्यास, वडील वर्ग त्यांना साहाय्यक सल्लागार म्हणून नेमू शकतात. मंडळीत अधिक वडील असल्यास दर वर्षी वेगवेगळे योग्यताप्राप्त वडील ही जबाबदारी सांभाळू शकतील. साहाय्यक सल्लागाराची जबाबदारी, आवश्यक असल्यास बायबल वाचनातील ठळक मुद्दे सादर करणाऱ्या बांधवांना खासगी सल्ला देणे ही असेल. परंतु सहवडिलांच्या किंवा सेवा सेवकांच्या प्रत्येक भाषणानंतर त्यांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही.
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी: २० मिनिटे. दर दोन महिन्यांनी प्रशाला पर्यवेक्षक उजळणी घेतील. ही उजळणी, वर सांगितल्याप्रमाणे, बायबल वाचनातील ठळक मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर असेल. उजळणी, गेल्या दोन महिन्यांच्या आणि चालू आठवड्याच्या प्रशालेत चर्चिलेल्या विषयांवर आधारित असेल. समजा ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणीच्या आठवड्यात तुमच्या मंडळीचे विभागीय संमेलन किंवा विभागीय पर्यवेक्षकांची भेट असल्यास, उजळणी एक आठवडा पुढे ढकलून त्या ऐवजी पुढच्या आठवड्याच्या नेमणूक क्र. १, २ आणि ३ सादर कराव्यात. साप्ताहिक बायबल वाचन किंवा बायबलचे ठळक मुद्दे या भागांमध्ये कसलाही फेरफार करू नये.
आराखडा
जाने. ५ बायबल वाचन: उत्पत्ति १-५
क्र. १: उत्पत्ति ३:१-१५
क्र. २: तणावाखाली असलेले कुटुंब (fy-MR पृष्ठे ५-९ परि. १-१४)
क्र. ३: तुमचे श्रम व्यर्थ नाहीत (१ करिंथ. १५:५८)
जाने. १२ बायबल वाचन: उत्पत्ति ६-१०
क्र. १: उत्पत्ति ९:१-१७
क्र. २: माझ्या भावंडांच्या सावलीतून मी कशी मुक्त होऊ शकते? (g-MR०४ १/८ पृष्ठे १३-१५)
क्र. ३: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य (fy-MR पृष्ठे ९-१२ परि. १५-२३)
जाने. १९ बायबल वाचन: उत्पत्ति ११-१६
क्र. १: उत्पत्ति १४:१-१६
क्र. २: तुम्ही विवाहाकरता तयार आहात का? (fy-MR पृष्ठे १३-१५ परि. १-६)
क्र. ३: यहोवा आपल्याला आकार कसा लावतो? (Isa. ६४:८)
जाने. २६ बायबल वाचन: उत्पत्ति १७-२०
क्र. १: उत्पत्ति १७:१-१७
क्र. २: नातेवाईकांचा आपल्यासारखाच विश्वास नसतो तेव्हा (g-MR०४ १/८ पृष्ठे २०, २१)
क्र. ३: प्रथम स्वतःला जाणून घ्या (fy-MR पृष्ठे १६-१८ परि. ७-१०)
फेब्रु. २ बायबल वाचन: उत्पत्ति २१-२४
क्र. १: उत्पत्ति २२:१-१८
क्र. २: रीतिरिवाज आणि बायबल (fy-MR पृ. १७)
क्र. ३: a इतरांवरही प्रेम करण्यास आपले अंतःकरण विशाल करण्याचे विविध मार्ग (२ करिंथ. ६:११-१३)
फेब्रु. ९ बायबल वाचन: उत्पत्ति २५-२८
क्र. १: उत्पत्ति २५:१-१८
क्र. २: सोबत्यात काय पाहावे? (fy-MR पृष्ठे १८-२२ परि. ११-१५)
क्र. ३: मुलांना पालकांकडून काय हवे असते (g-MR०४ ४/८ पृष्ठे ३-११)
फेब्रु. १६ बायबल वाचन: उत्पत्ति २९-३१
क्र. १: उत्पत्ति २९:१-२०
क्र. २: आपण “चिंता” करण्याचे का थांबवले पाहिजे? (मत्त. ६:२५)
क्र. ३: आगाऊ शोध घ्या (fy-MR पृष्ठे २२, २३ परि. १६-१९)
फेब्रु. २३ बायबल वाचन: उत्पत्ति ३२-३५
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
मार्च २ बायबल वाचन: उत्पत्ति ३६-३९
क्र. १: उत्पत्ति ३९:१-१६
क्र. २: तुमच्या प्रियाराधनेला आदरणीय ठेवा (fy-MR पृष्ठे २४, २५ परि. २०, २१)
क्र. ३: मानवजातीच्या खऱ्या गरजा केवळ देवाचे राज्यच भागवू शकते
मार्च ९ बायबल वाचन: उत्पत्ति ४०-४२
क्र. १: उत्पत्ति ४०:१-१५
क्र. २: लग्न समारंभाच्याही पुढे पाहणे (fy-MR पृष्ठे २५, २६ परि. २२, २३)
क्र. ३: b स्वैराचारी वृत्तीपासून सांभाळून राहा!
मार्च १६ बायबल वाचन: उत्पत्ति ४३-४६
क्र. १: उत्पत्ति ४४:१-१७
क्र. २: टिकाऊ विवाहाकरता पहिली गुरुकिल्ली (fy-MR पृष्ठे २७-२९ परि. १-६)
क्र. ३: गृहपाठ करायला मला वेळ कोठून मिळेल? (g-MR०४ ४/८ पृष्ठे २१-२३)
मार्च २३ बायबल वाचन: उत्पत्ति ४७-५०
क्र. १: उत्पत्ति ४८:१-१६
क्र. २: आपण सैतानाची भीती बाळगावी का?
क्र. ३: टिकाऊ विवाहाकरता दुसरी गुरुकिल्ली (fy-MR पृष्ठे ३०, ३१ परि. ७-१०)
मार्च ३० बायबल वाचन: निर्गम १-६
क्र. १: निर्गम १:१-१९
क्र. २: रोगांविरुद्धचा लढा (g-MR०४ ४/८ पृष्ठे ३-१३)
क्र. ३: कुटुंबात ख्रिस्तासारखे मस्तकपद (fy-MR पृष्ठे ३१-३३ परि. ११-१५)
एप्रि. ६ बायबल वाचन: निर्गम ७-१०
क्र. १: निर्गम ९:१-१९
क्र. २: कुटुंबात पत्नीला साजेशी अधीनता (fy-MR पृष्ठे ३४, ३५ परि. १६-१९)
क्र. ३: c गलतीकर ६:२ या वचनाचा गलतीकर ६:५ या वचनाशी आपण मेळ कसा घालू शकतो?
एप्रि. १३ बायबल वाचन: निर्गम ११-१४
क्र. १: निर्गम १२:२१-३६
क्र. २: टिकाऊ विवाहाकरता चांगले दळणवळण (fy-MR पृष्ठे ३५-३८ परि. २०-२६)
क्र. ३: देव आपल्यावर दुःखद प्रसंग का येऊ देतो? (g-MR ०४ ४/८ पृष्ठे १४-१६)
एप्रि. २० बायबल वाचन: निर्गम १५-१८
क्र. १: निर्गम १५:१-१९
क्र. २: खोट्या उपासनेपासून शुद्ध होण्यात काय काय गोवलेले आहे?
क्र. ३: आपल्या ऐपतीप्रमाणे राहा (fy-MR पृष्ठे ३९-४१ परि. १-६)
एप्रि. २७ बायबल वाचन: निर्गम १९-२२
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
मे ४ बायबल वाचन: निर्गम २३-२६
क्र. १: निर्गम २४:१-१८
क्र. २: कुटुंब मिळून भार वाहण्यास मदत करणे (fy-MR पृष्ठे ४२-४४ परि. ७-११)
क्र. ३: लग्न पवित्र का समजावे? (g-MR०४ ४/८ पृष्ठे २०, २१)
मे ११ बायबल वाचन: निर्गम २७-२९
क्र. १: निर्गम २९:१-१८
क्र. २: घरातील स्वच्छता—इतकी महत्त्वपूर्ण का? (fy-MR पृष्ठे ४५-४९ परि. १२-२०) #
क्र. ३: d भलत्याच गोष्टीला एकनिष्ठ राहणे म्हणजे काय व असे करणे धोकेदायक का आहे?
मे १८ बायबल वाचन: निर्गम ३०-३३
क्र. १: निर्गम ३१:१-१८
क्र. २: उत्तेजन आपल्याला वृद्धींगत करते (fy-MR पृष्ठे ४९, ५० परि. २१, २२)
क्र. ३: लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यात काय गैर आहे? (g-MR०४ १०/८ पृष्ठे १६-१८)
मे २५ बायबल वाचन: निर्गम ३४-३७
क्र. १: निर्गम ३७:१-२४
क्र. २: मुलाला शिक्षण देण्याबाबतीत बायबलचा दृष्टिकोन स्वीकारणे (fy-MR पृष्ठे ५१, ५२ परि. १-५)
क्र. ३: e स्वच्छंदीपणा काय आहे व तो का टाळला पाहिजे?
जून १ बायबल वाचन: निर्गम ३८-४०
क्र. १: निर्गम ४०:१-१९
क्र. २: आपल्या मुलाच्या गरजा पूर्ण करणे (fy-MR पृष्ठे ५३-५५ परि. ६-९)
क्र. ३: जोपासनेचे महत्त्व (g-MR०५ १/८ पृष्ठे ५-७)
जून ८ बायबल वाचन: लेवीय १-५
क्र. १: लेवीय ४:१-१५
क्र. २: तुमच्या मुलाच्या मनावर सत्य बिंबवा (fy-MR पृष्ठे ५५-५९ परि. १०-१९)
क्र. ३: f ख्रिश्चनांनी अधिकारपद कसे चालवले पाहिजे?
जून १५ बायबल वाचन: लेवीय ६-९
क्र. १: लेवीय ८:१-१७
क्र. २: पालक म्हणून तुमची भूमिका (g-MR०५ १/८ पृष्ठे ७-१०)
क्र. ३: कुटुंबात शिस्त लावण्याची महत्त्वपूर्ण गरज (fy-MR पृष्ठे ५९-६१ परि. २०-२३) #
जून २२ बायबल वाचन: लेवीय १०-१३
क्र. १: लेवीय ११:२९-४५
क्र. २: अपाय होण्यापासून तुमच्या मुलाचे संरक्षण करा (fy-MR पृष्ठे ६१, ६२ परि. २४-२६)
क्र. ३: बाप्तिस्मा घेतलेले शिष्य अनुभवत असलेले आशीर्वाद
जून २९ बायबल वाचन: लेवीय १४-१६
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
जुलै ६ बायबल वाचन: लेवीय १७-२०
क्र. १: लेवीय १९:१-१८
क्र. २: देवाच्या शिस्तीत मुलांना वाढवणे (g- ०५ १/८ पृष्ठे २०, २१)
क्र. ३: मुलांच्या शिक्षणासाठी ईश्वरी मार्गदर्शन मिळवा (fy-MR पृ. ६३ परि. २७, २८)
जुलै १३ बायबल वाचन: लेवीय २१-२४
क्र. १: लेवीय २२:१७-३३
क्र. २: किशोरवयाचा सुज्ञपणे उपयोग करा (fy-MR पृ. ६४ परि. १-३)
क्र. ३: खरे ख्रिस्ती गरीबांबद्दल काळजी कशी व्यक्त करतात
जुलै २० बायबल वाचन: लेवीय २५-२७
क्र. १: लेवीय २५:३९-५४
क्र. २: कुटुंबातील प्रामाणिक आणि खुले दळणवळण (fy-MR पृष्ठे ६५, ६६ परि. ४-७)
क्र. ३: मी अपयशी होते/होतो तेव्हा काय करू शकते/शकतो? (g-MR०५ १/८ पृष्ठे २३-२५)
जुलै २७ बायबल वाचन: गणना १-३
क्र. १: गणना ३:१-२०
क्र. २: सौम्य असण्याकरता आत्मसंयमाची गरज का आहे?
क्र. ३: कुटुंबात कशाचे दळणवळण करावे (fy-MR पृष्ठे ६७, ६८ परि. ८-११)
ऑग. ३ बायबल वाचन: गणना ४-६
क्र. १: गणना ४:१-१६
क्र. २: मातांसमोर असणारी आव्हाने (g-MR०५ ४/८ पृष्ठे ३-८)
क्र. ३: कौटुंबिक अभ्यास (fy-MR पृष्ठे ६९, ७० परि. १२-१४)
ऑग. १० बायबल वाचन: गणना ७-९
क्र. १: गणना ९:१-१४
क्र. २: घरात शिस्त आणि आदर (fy-MR पृष्ठे ७१, ७२ परि. १५-१८)
क्र. ३: यहोवाशी एकनिष्ठ राहण्याचे विविध मार्ग
ऑग. १७ बायबल वाचन: गणना १०-१३
क्र. १: गणना १३:१७-३३
क्र. २: कुटुंब मिळून काम व खेळ (fy-MR पृष्ठे ७२, ७३ परि. १९-२२)
क्र. ३: आईची भूमिका आदरास पात्र (g-MR०५ ४/८ पृष्ठे ९-११)
ऑग. २४ बायबल वाचन: गणना १४-१६
क्र. १: गणना १४:२६-४३
क्र. २: देवाचे नियमशास्त्र आपल्याला प्रिय असण्याचा काय अर्थ होतो? (स्तो. ११९:९७)
क्र. ३: किशोरवयीन ते प्रौढ (fy-MR पृष्ठे ७४, ७५ परि. २३-२५)
ऑग. ३१ बायबल वाचन: गणना १७-२१
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
सप्टें. ७ बायबल वाचन: गणना २२-२५
क्र. १: गणना २२:२०-३५
क्र. २: कुटुंबात एखादा बंडखोर असणे म्हणजे काय? (fy-MR पृष्ठे ७६-७८ परि. १-६)
क्र. ३: मुलांकडे आवश्यक लक्ष पुरवणे (g-MR०५ ४/८ पृष्ठे १२-१३)
सप्टें. १४ बायबल वाचन: गणना २६-२९
क्र. १: गणना २७:१-१४
क्र. २: प्रभूचे शिक्षण म्हणजे काय व ते मुलांना देणे का महत्त्वाचे आहे? (इफिस. ६:४)
क्र. ३: बंडाळीची कारणे (fy-MR पृष्ठे ७८, ७९ परि. ७, ८)
सप्टें. २१ बायबल वाचन: गणना ३०-३२
क्र. १: गणना ३२:१-१५
क्र. २: स्वर्गाची आशा सर्वच ख्रिश्चनांकरता आहे का?
क्र. ३: मोकळीक देणारा एली आणि निर्बंध घालणारा रहबाम (fy-MR पृष्ठे ८०, ८१ परि. ९-१३)
सप्टें. २८ बायबल वाचन: गणना ३३-३६
क्र. १: गणना ३३:१-२३
क्र. २: मूलभूत गरजा पूर्ण केल्याने बंडाळीला प्रतिबंध होऊ शकतो (fy-MR पृष्ठे ८२-८४ परि. १४-१८) #
क्र. ३: देवाचे राज्य कोणकोणत्या मार्गांनी सर्व मानवी सरकारांहून वरचढ आहे?
ऑक्टो. ५ बायबल वाचन: अनुवाद १-३
क्र. १: अनुवाद २:१-१५
क्र. २: मी अंगमेहनतीचं काम करायला का शिकलं पाहिजे? (g-MR०५ ४/८ पृष्ठे २०-२२)
क्र. ३: मुले अडचणीत सापडतात तेव्हा (fy-MR पृष्ठे ८५-८७ परि. १९-२३)
ऑक्टो. १२ बायबल वाचन: अनुवाद ४-६
क्र. १: अनुवाद ४:१५-२८
क्र. २: करारी बंडखोराला हाताळणे (fy-MR पृष्ठे ८७-८९ परि. २४-२७)
क्र. ३: थोडके हे बरे केव्हा म्हणता येईल? (नीति. १५:१६)
ऑक्टो. १९ बायबल वाचन: अनुवाद ७-१०
क्र. १: अनुवाद ९:१-१४
क्र. २: तुमच्या मुलांना कोण शिकवील? (fy-MR पृष्ठे ९०-९२ परि. १-७)
क्र. ३: स्वर्गाची आशा किती जणांसाठी आहे असे बायबल सांगते?
ऑक्टो. २६ बायबल वाचन: अनुवाद ११-१३
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
नोव्हें. २ बायबल वाचन: अनुवाद १४-१८
क्र. १: अनुवाद १५:१-१५
क्र. २: देवाचे भय बाळगण्यात काय काय गोवलेले आहे?
क्र. ३: लैंगिकतेबद्दल देवाचा दृष्टिकोन (fy-MR पृष्ठे ९२, ९३ परि. ८-११)
नोव्हें. ९ बायबल वाचन: अनुवाद १९-२२
क्र. १: अनुवाद २२:१-१९
क्र. २: पालकांकरता असलेला गृहपाठ (fy-MR पृष्ठे ९४, ९५ परि. १२, १३)
क्र. ३: g एक तरुणी माझ्या प्रेमात पडते तेव्हा माझी प्रतिक्रिया कशी असावी? (g-MR०५ ७/८ पृष्ठे १८-२०)
नोव्हें. १६ बायबल वाचन: अनुवाद २३-२७
क्र. १: अनुवाद २५:१-१६
क्र. २: तुमच्या मुलांचे मित्र (fy-MR पृष्ठे ९५-९७ परि. १४-१८)
क्र. ३: h कोणकोणत्या गोष्टींना आपण पवित्र समजले पाहिजे?
नोव्हें. २३ बायबल वाचन: अनुवाद २८-३१
क्र. १: अनुवाद ३०:१-१४
क्र. २: शास्त्रवचनांनुसार ‘मोठ्या लोकसमुदायासाठी’ कोणती आशा आहे?
क्र. ३: कुटुंबाकरता कोणत्या प्रकारचे मनोरंजन चांगले आहे (fy-MR पृष्ठे ९७-१०१ परि. १९-२५) #
नोव्हें. ३० बायबल वाचन: अनुवाद ३२-३४
क्र. १: अनुवाद ३२:१-२१
क्र. २: “परमेश्वराचा मोठा दिवस” म्हणजे काय? (सफ. १:१४)
क्र. ३: तुमचे कुटुंब जगाला जिंकू शकते (fy-MR पृष्ठे १०१, १०२ परि. २६, २७)
डिसें. ७ बायबल वाचन: यहोशवा १-५
क्र. १: यहोशवा ५:१-१५
क्र. २: आपल्या मित्रांचे देखील देवावर प्रेम असले पाहिजे
क्र. ३: एक-पालक कुटुंबे यशस्वी होऊ शकतात (fy-MR पृष्ठे १०३, १०४ परि. १-४)
डिसें. १४ बायबल वाचन: यहोशवा ६-८
क्र. १: यहोशवा ८:१-१७
क्र. २: कुटुंबाच्या नित्यक्रमावर प्राविण्य मिळवणे (fy-MR पृष्ठे १०४, १०५ परि. ५-८)
क्र. ३: उपदेशक ७:२१, २२ मधील सल्ला व्यावहारिक का आहे?
डिसें. २१ बायबल वाचन: यहोशवा ९-११
क्र. १: यहोशवा ९:१-१५
क्र. २: उदरनिर्वाह करण्याचे आव्हान (fy-MR पृष्ठे १०५, १०६ परि. ९, १०)
क्र. ३: देवाचे शांतीमय नवीन जग—तुम्ही तेथे जगू शकता
डिसें. २८ बायबल वाचन: यहोशवा १२-१५
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
[तळटीपा]
a हे भाषण केवळ बांधवांना द्यावे; शक्यतो, वडिलांना किंवा सेवा सेवकांना.
b हे भाषण केवळ बांधवांना द्यावे; शक्यतो, वडिलांना किंवा सेवा सेवकांना.
c हे भाषण केवळ बांधवांना द्यावे; शक्यतो, वडिलांना किंवा सेवा सेवकांना.
d हे भाषण केवळ बांधवांना द्यावे; शक्यतो, वडिलांना किंवा सेवा सेवकांना.
e हे भाषण केवळ बांधवांना द्यावे; शक्यतो, वडिलांना किंवा सेवा सेवकांना.
f हे भाषण केवळ बांधवांना द्यावे; शक्यतो, वडिलांना किंवा सेवा सेवकांना.
g हे भाषण केवळ बांधवांना द्यावे; शक्यतो, वडिलांना किंवा सेवा सेवकांना.
h हे भाषण केवळ बांधवांना द्यावे; शक्यतो, वडिलांना किंवा सेवा सेवकांना.
# चौकोनातील माहितीचा देखील भाषणात समावेश करावा.