वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०८ पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००८
आमची राज्य सेवा—२००८
km १०/०८ पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

ऑक्टोबर २७, २००८ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, सप्टेंबर १ ते ऑक्टोबर २७, २००८ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील.

भाषणाचे गुण

१. इतर लोक जो विश्‍वास करतात तो का करतात हे आपण कसे जाणून घेऊ शकतो? [be पृ. २५९ परि. १, २]

२. आपण एखाद्या व्यक्‍तीला तिच्या मनातील पूर्वग्रह किंवा द्वेष काढून टाकण्यास कशा प्रकारे मदत करू शकतो? [be पृ. २६० परि. २]

३. यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध सुधारण्याकरता आपण आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या हृदयाचे परीक्षण करण्यास कशाप्रकारे मदत करू शकतो? [be पृ. २६१ परि. ३]

४. लोकांच्या हृदयाप्रत पोचण्याचा प्रयत्न करत असताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? [be पृ. २६२ परि. ५]

५. मंडळीतल्या सभांच्या वेळेकडे आपण लक्ष का दिले पाहिजे? [be पृ. २६३ परि. १, ३, पेटी]

नेमणूक क्र. १

६. आपल्याला व्यक्‍तिगत सल्ला दिला जातो तेव्हा आपण काय केले पाहिजे? [wt पृ. १३६ परि. २]

७. मंडळीतल्या सर्वांबद्दल आपण आपले प्रेम कसे वाढवू शकतो? [wt पृ. १४९ परि. १२]

८. पतीने कुटुंबात आपले मस्तकपद कसे चालवले पाहिजे? [wt पृ. १५४ परि. ७]

९. यहोवाच्या दिवशी काय होईल असे पेत्राने समजावून सांगितले? [wt पृ. १७६-७ परि. ५]

१०. मोठ्या संकटातून सुखरूप पार झालेल्यांना कोणते अद्‌भुत स्वातंत्र्य अनुभवायला मिळेल? [wt पृ. १८८ परि. ११]

साप्ताहिक बायबल वाचन

११. ‘त्या [दुष्ट] माणसाला देहस्वभावाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे अशा हेतूने की आत्मा तारला जावा,’ याचा अर्थ काय होतो? (१ करिंथ. ५:५) [w०८-MR ७/१५ “यहोवाचे वचन सजीव आहे—करिंथकरांना लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे”]

१२. “जितक्यांदा” तुम्ही येशूच्या मरणाचे स्मरण करता असे म्हणताना पौलाचा काय अर्थ होता आणि ख्रिश्‍चनांनी ‘केव्हापर्यंत’ असे करायचे होते? (१ करिंथ. ११:२६) [w०८-MR ७/१५ “यहोवाचे वचन सजीव आहे—करिंथकरांना लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे”]

१३. दुसरे करिंथकर १२:२-४ मध्ये कोणत्या दृष्टांताचा उल्लेख करण्यात आला आहे व हा दृष्टांत कोणाला झाला होता? [w०४-MR १०/१५ पृ. ८ परि. ४; पृ. १० परि. ९]

१४. पौलाने मोशेच्या नियमशास्त्राची तुलना ‘ख्रिस्ताकडे पोंचविणाऱ्‍या बालरक्षकाशी’ का केली? (गलती. ३:२४) [w०८-MR ३/१ पृ. १८-२१]

१५. ‘[तुम्हा बांधवांचा] आत्मा, जीव व शरीर ही संपूर्णपणे राखली जावोत’, असे जेव्हा पौलाने म्हटले, तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? (१ थेस्सलनी. ५:२३) [w०८-MR ९/१५ “यहोवाचे वचन सजीव आहे—थेस्सलनीकाकरांना व तीमथ्याला लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे”]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा