वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०८ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००८
  • उपशिर्षक
  • सप्टेंबर ८ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर १५ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर २२ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर २९ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर ६ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००८
km ९/०८ पृ. २

सेवा सभा आराखडा

सप्टेंबर ८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  २५ (२०४)

१० मि: स्थानीक घोषणा. स्थानीक क्षेत्रातील बहुतेक लोकांना जुलै ते सप्टेंबरच्या टेहळणी बुरूज अंकातील कोणते लेख आवडलेत यावर टिपणी देण्यास श्रोत्यांना सांगा. नियतकालिकातील लेख सादर करण्याकरता श्रोत्यांनी, कोणते प्रश्‍न वा कोणती शास्त्रवचने लोकांना दाखवलीत, ते विचारा. घरमालकाला आध्यात्मिक गोष्टीत आवड आहे हे जाणवल्यावरच नियतकालिक कसे सादर करायचे त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: बायबल विद्यार्थ्यांना शिक्षक बनण्यास मदत करा. टेहळणी बुरूज जानेवारी १५, २००७, पृष्ठे २९-३०, परिच्छेद १४-२० मधील माहितीच्या आधारावर भाषण. एक प्रचारक एका नवीन बायबल विद्यार्थ्याला जाहीर भाषण आणि टेहळणी बुरूज अभ्यासाची माहिती देत असल्याचे व या सभांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि: लोकांच्या मनात असलेल्या पूर्वग्रहावर मात करणे. पूर्वग्रहामुळे आपल्या सेवेवर कसा परिणाम होऊ शकतो, त्याविषयी संस्थेच्या प्रकाशनांमध्ये छापलेल्या माहितीच्या आधारावर वडिलांचे भाषण. अशा पूर्वग्रहांवर मात कशी केली जाऊ शकते ते समजावून सांगा. कधीकधी, प्रचार करताना आपण जे शब्द वापरतो त्यामुळे किंवा प्रचार कार्यातील अथवा इतर दैनंदिन कार्यातील आपले वर्तन पाहून इतर लोकांच्या मनातील पूर्वग्रह निघून ते खुल्या मनाने सत्य ऐकतील. यामुळे आपण आपले बोलणे आणि कार्य याकडे लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे. (१ पेत्र २:१२; ३:१, २) पूर्वग्रहांवर मात कशी केली जाऊ शकते हे दाखवण्याकरता काही निवडक स्थानीक किंवा प्रकाशित अनुभव सांगा.

गीत क्र.  १५ (१२७)

सप्टेंबर १५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  ५ (४६)

१० मि: स्थानीक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.

२० मि: मागच्या वर्षी केलेल्या कार्याचा आढावा. सेवा पर्यवेक्षक किंवा इतर अनुभवी वडिलांचे भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. मागील सेवा वर्षात मंडळीने केलेल्या कार्याची उजळणी करावी व सेवाकार्यात साध्य केलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे. योग्य मुद्द्‌यांवर सर्वांची प्रशंसा करावी. एक अथवा दोन प्रचारकांना, त्यांना आलेले उल्लेखनीय अनुभव सांगण्याची आधीच योजना करा. येणाऱ्‍या सेवा वर्षात मंडळीने ज्यांवर लक्ष दिले पाहिजे असे एक अथवा दोन मुद्दे सांगा आणि सुधारणा करण्याकरता व्यावहारिक सूचना द्या.

१५ मि: सृष्टीवर माझा विश्‍वास आहे हे मी लोकांना कसे समजावून सांगू शकतो? संस्थेच्या प्रकाशनांमध्ये छापलेल्या माहितीच्या आधारावर भाषण. श्रोत्यांना विचारा, की शाळेत, कामाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी कोणी सृष्टीविषयी विचारले तेव्हा त्यांनी कशा प्रकारे उत्तर दिले. एखाद-दोन बांधवांना आधीच तयार केले जाऊ शकते.

गीत क्र.  ७ (५१)

सप्टेंबर २२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  ८ (५३)

१० मि: स्थानीक घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. शाखेकडून आलेल्या पान १ वरील पत्राची चर्चा करा.

२० मि: तुमच्या कार्यांचे तुम्हाला प्रतिफळ मिळेल. टेहळणी बुरूज एप्रिल १५, २००५, पृष्ठे २८ परिच्छेद ५ ते पृष्ठ २९ शेवटपर्यंत असलेल्या माहितीच्या आधारावर भाषण. एक अथवा दोन आवेशी प्रचारकांची मुलाखत घ्या. त्यांना विचारा, की यहोवाने त्यांच्या भौतिक व भावनिक गरजा कशा प्रकारे भागवल्या.

१५ मि: ऑक्टोबर ते डिसेंबरचे टेहळणी बुरूज सादर करण्याकरता तयारी करा. नियतकालिकाची थोडक्यात माहिती द्या आणि क्षेत्रातील लोकांना कोणते लेख आवडतील हे श्रोत्यांना विचारा. नियतकालिकातील लेख सादर करण्याकरता कोणते प्रश्‍न विचारता येऊ शकतात किंवा कोणते शास्त्रवचन दाखवता येईल? घरमालकाला आपला संदेश खरोखरच आवडत आहे किंवा नाही, हे आपल्याला कसे समजू शकेल? आमची राज्य सेवा यातील नमुना सादरीकरण कसे वापरता येईल, त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. मंडळीतल्या एका वडिलांना, स्थानीक क्षेत्राला लागू होईल अशा लेखावर त्यांनी थोडक्यात तयार केलेले सादरीकरणाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगा.

गीत क्र.  २० (९३)

सप्टेंबर २९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  ६ (४५)

१० मि: स्थानीक घोषणा. सर्वांना सप्टेंबर महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. उन्हाळ्याच्या सुटीत गावी गेलेले असताना, किंवा संमेलनांच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले असताना अथवा इतर ठिकाणी गेलेले असताना आलेले उत्तेजनदायक अनुभव सांगण्यासाठी एक अथवा दोन प्रचारकांना आधीच सांगा.

१५ मि: स्थानीक गरजा.

२० मि: “खास पत्रिका मोहीम—नोव्हेंबर १०–डिसेंबर ७!”aपत्रिका असतील तर श्रोत्यांमध्ये प्रत्येकाला एक एक वाटा. परिच्छेद २ वर चर्चा करताना पत्रिकेच्या आशयाची थोडक्यात उजळणी करा. परिच्छेद ४ वर चर्चा करताना, प्रचारक ही पत्रिका व्यवहार कुशलतेचा व समंजसपणाचा उपयोग कसा करतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. परिच्छेद ६ वर चर्चा करताना, एक प्रचारक पुनर्भेटीत पत्रिकेच्या साहाय्याने बायबल अभ्यास सुरू करतो असे एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत क्र.  २२ (१३०)

ऑक्टोबर ६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  २ (१५)

१० मि: स्थानीक घोषणा.

१५ मि: प्रश्‍न पेटी. श्रोत्यांबरोबर चर्चा. टेहळणी बुरूज जून १५, २००५, पृष्ठे २०-२२, परिच्छेद १०-१६ मधील मुद्दे घ्या.

२० मि: “यहोवावर प्रेम करायला इतरांना शिकवा.”bवेळ असल्यास, श्रोत्यांना उद्धृत शास्त्रवचनांवर टिपणी करायला सांगा.

गीत क्र.  २१ (१९१)

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा