वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०८ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००८
आमची राज्य सेवा—२००८
km ९/०८ पृ. ३

घोषणा

▪ साहित्य सादरता सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करावा. घरमालकांजवळ हे पुस्तक असल्यास, थोडक्यात बायबल अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवून या पुस्तकाचा चांगला उपयोग कसा करता येईल हे त्यांना दाखवावे. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज नियतकालिक. घरमालकाने आस्था दाखवल्यास, तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने चर्चा करावी. नोव्हेंबर: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न करा. डिसेंबर: सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करा. आपल्याला मुले आहेत, असे घरमालक म्हणत असतील तर बायबल कथांचं माझं पुस्तक सादर करा.

▪ नोव्हेंबर महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे हा महिना साहाय्यक पायनियरींगसाठी उत्तम महिना आहे.

▪ सन २००९ च्या स्मारक विधीच्या काळातील खास जाहीर भाषण एप्रिल २०, २००९ या आठवड्यात दिले जाईल. भाषणाचा विषय नंतर सांगितला जाईल. त्या आठवड्यात ज्या मंडळ्यांची विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल किंवा ज्यांचे संमेलन असेल त्या मंडळ्यांमध्ये हे भाषण पुढील आठवडी दिले जाईल. एप्रिल २० या आठवड्याच्या आधी कोणत्याही मंडळीत हे भाषण दिले जाऊ नये.

▪ मंडळ्यांनी, २००८ सालचे वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स, आणि सीडी-रोमवर वॉचटावर लायब्ररी-२००८ आवृत्ती यांची मागणी त्यांच्या पुढील लिटरेचर रिक्वेस्टसोबत पाठवण्यास विसरू नये. २००८ सालचे वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स हे केवळ मंडळीच्या सदस्यांसाठीच आहे आणि ते मंडळीद्वारेच प्राप्त करता येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने जून, जुलै व ऑगस्ट महिन्याचा मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. नेहमी एकाच बांधवाला या कामासाठी वापरू नये. हिशेब तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.—इंस्ट्रक्शन्स फॉर काँग्रिगेशन अकाउंटिंग (S-27) यातील माहिती पडताळून पाहावी.

▪ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

बायबल कथांचं माझं पुस्तक (मोठ्या आकाराचे) —पंजाबी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा