वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०८ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००८
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २५ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर १ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००८
km ८/०८ पृ. २

सेवा सभा आराखडा

ऑगस्ट ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

१० मि: स्थानीय घोषणा. क्षेत्रातील बहुतेक लोकांना चालू नियतकालिकांतील आवडणाऱ्‍या लेखांवर टिपणी देण्यास श्रोत्यांना विचारा. नियतकालिकातल्या लेखांतील कोणते विशिष्ट मुद्दे क्षेत्रातील लोकांना दाखवण्याचे ठरवले आहे, हे श्रोत्यांना विचारा. संभाषण सुरु करण्याकरता कोणता प्रश्‍न विचारता येईल? त्यानंतर लेखातील कोणते वचन वाचून दाखवता येईल? सुचवलेल्या सादरीकरणांचा कसा उपयोग करायचा त्याची प्रात्यक्षिके दाखवा.

१० मि: अंतःकरणापर्यंत पोचण्याकरता देवाच्या वचनाचा उपयोग करा. टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, २००५, पृष्ठे २८-३१ वरील माहितीच्या आधारावर भाषण. पेत्राला मदत करण्यासाठी येशूने शास्त्रवचनांचा उपयोग कसा केला त्यावर चर्चा करा. येशूचे अनुकरण करून आपणही, आपल्या मुलांच्या, बायबल विद्यार्थ्यांच्या आणि स्वतःच्याही विचारसरणीत किंवा भावनांमध्ये सुधारणा करण्याची गरज असते तेव्हा शास्त्रवचनांचा उपयोग कसा करू शकतो त्यावर चर्चा करा.

२५ मि:“विरोध करणाऱ्‍या लोकांकडून कशाविषयीहि भयभीत होऊ नका.”a मोठ्या व हिंसक जमावाचा किंवा घोळक्याचा सामना केलेल्या एखाद्या प्रचारकाची अथवा पायनियरची मुलाखत घ्या.

गीत क्र. ४ (४३)

ऑगस्ट १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २४ (१८५)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. “नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम,” या भागाची चर्चा. विभागीय संमेलनाची तारीख माहीत असेल तर ती सांगा.

२० मि: आपल्या पेहराव्याने व केशभूषेने यहोवाचा आदर होतो. वडिलांचे भाषण. यहोवा पवित्र देव असल्यामुळे, त्याच्या लोकांमध्ये शारीरिक स्वच्छतेला खूप महत्त्व दिले जाते. (निर्ग. ३०:१७-२१; ४०:३०-३२) सर्व वेळी आणि विशेषकरून सेवेला जाताना सभ्य पेहराव व केशभूषा करून आपण यहोवाला संतुष्ट करतो व त्याचे गौरव करतो. (१ पेत्र २:१२) पण आपण असे केले नाही तर कदाचित “देवाच्या वचनांची निंदा” होण्यास आपण कारणीभूत ठरू शकू. (तीत २:५) एखाद्या बंधूच्या अथवा भगिनीच्या सभ्य पेहराव्यामुळे साक्ष देता आली यासंबंधाने स्थानीय अथवा प्रकाशनांमध्ये छापलेला अनुभव सांगा.

१५ मि: प्रभावी साक्ष देणारे तरुण. पालक आणि त्यांच्या मुलांकरता एक उत्साहवर्धक भाषण. साक्ष देण्याच्या संधीचा फायदा घेण्यास तरुणांना आठवण करून द्या. वेळ असल्यास, श्रोत्यांतील बंधूभगिनींना, शाळेत असताना साक्ष दिल्याचे अनुभव विचारा.

गीत क्र. १६ (१४३)

ऑगस्ट २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १३ (१२४)

१५ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. “नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम” या लेखाची चर्चा करा आणि संमेलनाची तारीख माहीत असल्यास ती सांगा.

१५ मि: स्थानीय गरजा.

१५ मि: सप्टेंबर महिन्यात बायबल काय शिकवते पुस्तक सादर करणे. भाषण आणि प्रात्यक्षिके. जानेवारी २००६ च्या आमची राज्य सेवा यातील पुरवणीत दिलेल्या काही नमुना सादरीकरणांची उजळणी करा. दोन प्रात्यक्षिके दाखवा; एका प्रात्यक्षिकात पुस्तक कसे सादर करायचे ते दाखवा आणि दुसऱ्‍या प्रात्यक्षिकात बायबल अभ्यास सुरु करण्याच्या हेतूने प्रचारक पुनर्भेट करत असल्याचे दाखवा.

गीत क्र. ९ (३७)

सप्टेंबर १ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १२ (११३)

१० मि: स्थानीय घोषणा. सर्वांना ऑगस्ट महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या.

२० मि: वेगळे राहात असले तरी त्यांना विसरलो नाही. टेहळणी बुरूज एप्रिल १५, २००८, पृष्ठे २५-२८ लेखावर आधारित भाषण. मंडळीतले कोणी वृद्ध बंधूभगिनी स्थानीय वृद्धाश्रमात राहत असतील तर ते सांगा. जर तसे कोणी नसेल तर, लेखात सुचवलेल्या सिद्धांतांचा उपयोग करून मंडळीतल्या आजारी अथवा मंडळीच्या कार्यांमध्ये पुरेसा भाग घेऊ न शकणाऱ्‍या बंधूभगिनींना मदत करण्याचे उत्तेजन द्या.

१५ मि: पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्याचा सप्टेंबर महिन्यात प्रयत्न करा. श्रोत्यांबरोबर चर्चा करा. सप्टेंबर महिन्यात आपण पहिल्याच भेटीत बायबल काय शिकवते पुस्तक सादर करून घरमालकाशी त्यातील काही परिच्छेदांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जानेवारी २००६ च्या आमची राज्य सेवा मधील पुरवणीतील सुचनांची उजळणी करा आणि पहिल्या भेटीत बायबल अभ्यास कसा सुरु करायचा त्याची एक अथवा दोन प्रात्यक्षिके दाखवा. पण बायबल अभ्यास सुचवण्याआधी, घरमालकाला खरोखरच आवड आहे किंवा नाही हे पाहण्यास श्रोत्यांना सांगा.

गीत क्र. २८ (२२४)

[तळटीप]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा