सेवा सभा आराखडा
सूचना: प्रांतीय अधिवेशनाच्या महिन्यांदरम्यान नेहमीप्रमाणे आमची राज्य सेवा यात दर आठवड्यात एका सेवा सभेचे आयोजन केले जाईल. “देवाच्या आत्म्याने मार्गदर्शित” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मंडळ्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार फेरफार करावे लागतील. उचित असते तेव्हा, अधिवेशनाच्या आदल्या आठवड्याच्या सेवा सभेत १५ मिनिटांसाठी, या महिन्याच्या पुरवणीतील तुमच्या मंडळीला लागू होणारा सल्ला व सूचना यांची उजळणी करा. तुमचे अधिवेशन होऊन एक किंवा दोन महिने उलटल्यानंतर, एका सेवा सभेतील १५ ते २० मिनिटे (कदाचित स्थानीय गरजांचा भाग), प्रचारकांना क्षेत्र सेवाकार्यासाठी उपयुक्त वाटलेल्या अधिवेशनातील मुद्द्यांची उजळणी करण्यासाठी बाजूला ठेवा. सेवा पर्यवेक्षकांनी ही उजळणी हाताळावी. श्रोत्यांनी, शिकलेल्या माहितीचा आपल्या सेवेत कशा प्रकारे उपयोग करण्याचे ठरवले आहे किंवा कशा प्रकारे उपयोग करत आहेत त्यावर टिपणी देण्यास त्यांना आमंत्रण द्या.
जुलै १४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ११ (८५)
१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरीकरणांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, जुलै ते सप्टेंबरचा अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.
१५ मि: सध्याच्या काळाचे महत्त्व कधीही नजरेआड न होऊ देणे. टेहळणी बुरूज, जानेवारी १, २००७, पृष्ठे ११-१२, परिच्छेद १७-२१ यातील माहितीच्या आधारे उत्साहवर्धक भाषण.
२० मि:“मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी बायबल कथांचं माझं पुस्तक.”a पुस्तकातील ठळक वैशिष्ट्ये सांगा. पुस्तक अभ्यासाच्या आराखड्याचा आढावा घ्या. सर्वांना नियमितपणे अभ्यासाला उपस्थित राहण्याचे आणि टिपणी करण्यात पूर्ण सहभाग घेण्याचे प्रोत्साहन द्या. सभेसाठी उत्तम पूर्वतयारी करण्यासाठी परिचित असलेल्या एक किंवा दोन प्रचारकांची थोडक्यात मुलाखत घ्या. आणि असे करण्यासाठी ते कशामुळे प्रेरित होतात हे त्यांना विचारा.
गीत क्र. २६ (२१२)
जुलै २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २८ (२२४)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१५ मि: स्थानीय गरजा.
२० मि: “परिणामकारक पुनर्भेटींकरता चांगली तयारी करणे आवश्यक.”b पुनर्भेटींची तयारी करत असलेल्या एका प्रचारकाचे चार मिनिटांचे स्वगत भाषण सादर करावे. तो आपल्या नोंदी वाचून येत्या शनिवारी किंवा रविवारी दोन व्यक्तींना भेट द्यायचे ठरवतो असे दाखवा. मग या दोघांशी आधीच्या भेटीत कशाविषयी चर्चा केली होती हे आठवून, पुनर्भेट देताना आपले काय उद्दिष्ट आहे आणि ते कसे साध्य करता येईल याची तो तयारी करतो. एका व्यक्तीकरता तो बायबल अभ्यास सुरू करण्याचे ध्येय ठेवतो. तर दुसऱ्या व्यक्तीला भेटताना, तो परिच्छेद ५ मधील एका सूचनेचा अवलंब करून तिची आस्था वाढवण्याचा प्रयत्न करायचे ठरवतो.
गीत क्र. ४ (४३)
जुलै २८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १६ (१४३)
१० मि: स्थानीय घोषणा. सर्वांना जुलै महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. ऑगस्ट महिन्यात कोणते साहित्य सादर करायचे आहे याचा उल्लेख करून एका सादरीकरणाचे प्रात्यक्षिक दाखवावे.
१० मि: तुम्ही धैर्याने सुवार्तेची घोषणा करता का? आमची राज्य सेवा, डिसेंबर २००० पृष्ठ १ वरील माहितीवर आधारित भाषण. धैर्याने सुवार्तेची घोषणा करण्याच्या महत्त्वावर जोर द्या.
२५ मि: “आध्यात्मिक अन्नाचा आस्वाद घेण्याची एक आनंददायक संधी.”c हा भाग मंडळीच्या सचिवांनी हाताळावा. मंडळीला कोणत्या अधिवेशनास उपस्थित राहायचे आहे ते सांगा. “प्रांतीय अधिवेशनाच्या सूचना” या चौकटीतील मुद्द्यांची उजळणी करा.
गीत क्र. ६ (४५)
ऑगस्ट ४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २९ (२२२)
१० मि: स्थानीय घोषणा.
१५ मि: तुमची मुले त्यांच्या खास क्षेत्रात साक्ष देण्याकरता सुसज्ज आहेत का? भाषण आणि श्रोत्यांसोबत चर्चा. ख्रिस्ती मुलांना शाळेत कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते ते सांगा. आईवडील व मुले या संदर्भात उपयुक्त माहिती मिळवण्याकरता टेहळणी बुरूज प्रकाशन सूची (इंग्रजी) याचा कसा वापर करू शकतात हे सांगा. काही उदाहरणे द्या. (“शाळा” हे मुख्य शीर्षक आणि “अनुभव” हे उपशीर्षक पाहा.) श्रोत्यांपैकी ख्रिस्ती कुटुंबात वाढलेल्या प्रचारकांना, त्यांच्या आईवडिलांनी शाळेतील आव्हानांना तोंड देण्यास व शालेय जीवनात बायबल तत्त्वांचा अवलंब करण्यास कशी मदत केली हे विचारा. सावध राहा! (इंग्रजी) यातील विषयांचा शाळेत निबंध इत्यादी लिहिताना कसा उपयोग झाला हेही सांगण्यास त्यांना विनंती करा. शालेय मुलांच्या या खास क्षेत्रात कार्य करणे कशा प्रकारे त्यांच्याकरता संरक्षण ठरले याचाही खुलासा करण्यास सांगा.
२० मि: “तटबंदी जमीनदोस्त करणे.”d खोलवर रुजलेल्या धार्मिक विश्वासांचा त्याग करण्यास बायबल अभ्यास घेणाऱ्या बांधवाने अथवा भगिनीने कशा प्रकारे धीराने मदत केली हे सांगण्यास श्रोत्यांना निवेदन करा.
गीत क्र. १७ (१८७)
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.