वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०८ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००८
  • उपशिर्षक
  • जून ९ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून १६ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून २३ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून ३० ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै ७ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००८
km ६/०८ पृ. २

सेवा सभा आराखडा

जून ९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २१ (१९१)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या दुसऱ्‍या सादरीकरणाचा उपयोग करून एप्रिल-जूनचा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

२० मि: बायबल अभ्यास संचालित करण्यासाठी तयारी कशी करायची? ऑगस्ट २००४ च्या आमची राज्य सेवा पृष्ठ १ वरील लेखावर आधारित भाषण. चर्चेनंतर, एक प्रात्यक्षिक दाखवा, ज्यात एक प्रचारक बायबल अभ्यास संचालित करण्यासाठी घाईने तयारी करत आहे असे दाखवा. पण, दुसरा एक प्रचारक, आमची राज्य सेवा यात सुचवलेल्या मुद्द्‌यांचा उपयोग कसा केला जाऊ शकतो, यावर विचार करून मग तयारी कशी करतो ते दाखवा.

१५ मि: “प्रचार करण्याचे सोडू नका.”a वेळ असल्यास, श्रोत्यांना उल्लेखित शास्त्रवचनांवर टिपणी करण्यास सांगा.

गीत क्र. ८ (५३)

जून १६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १८ (१६२)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा.

१५ मि: सुवार्तेचे महत्त्व समजावून सांगा. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ १५९ वरील माहितीच्या आधारावर भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा. स्थानीय क्षेत्रातील लोकांना सध्या कोणकोणत्या गोष्टींची चिंता वाटत आहे, ते विषय मांडण्यास श्रोत्यांना सांगा. हे विषय आपण आपल्या सादरीकरणांमध्ये कशाप्रकारे गोवू शकतो, यावर श्रोत्यांची मते विचारा.

२० मि: “तुमचे कुटुंब बचावाची तयारी करत आहे का?”b वेळ असेल तर श्रोत्यांना उल्लेखित शास्त्रवचनांवर टिपणी करण्यास सांगा.

गीत क्र. १ (१३)

जून २३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २६ (२१२)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. जुलै महिन्यात कोणते साहित्य सादर करणार आहोत ते सांगा आणि एक प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि: सामान्य पायनियरींगमुळे जीवन अधिक अर्थपूर्ण बनले. जानेवारी १५, २००८ च्या टेहळणी बुरूज पृष्ठे १७-१९ वरील लेखावर आधारित भाषण. मंडळीत सामान्य पायनियर असल्यास, एक नवीन व दुसरा, अनेक वर्षांपासून पायनियरींग करत असलेल्या अशा दोघा सामान्य पायनियरांची मुलाखत घेता येईल. या बहुमूल्य सेवेमुळे त्यांचे जीवन अधिक अर्थपूर्ण कसे बनले त्यावर टिपणी करण्यास त्यांना सांगितले जाऊ शकते.

१५ मि: प्रश्‍नांची उत्तरे देताना बायबलचा उपयोग करा. सेवा प्रशाला पुस्तकाच्या पृष्ठे १४३-४ वरील माहितीच्या आधारावर भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा. क्षेत्रात सहसा विचारल्या जाणाऱ्‍या प्रश्‍नाचे उत्तर प्रचारक बायबलमधून कसे दाखवतो त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत क्र. १० (८२)

जून ३० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २८ (२२४)

१० मि: स्थानीय घोषणा. जून महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची प्रचारकांना आठवण करून द्यावी. पृष्ठ ४ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या दुसऱ्‍या सादरीकरणाचा उपयोग करून जुलै ते सप्टेंबरचा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

२० मि: आपले संभाषण कौशल्य कसे सुधारायचे? सेवा प्रशाला पुस्तकाच्या पृष्ठ ६२ वरील परिच्छेद ४ ते पृष्ठ ६४ वरील शेवटच्या परिच्छेदावर आधारित भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा. स्थानीय क्षेत्राला ही माहिती लागू करा. घरोघरचे साक्षकार्य करताना अथवा अनौपचारिक साक्षकार्य करत असताना, लोकांबरोबर संभाषण सुरू करण्यात पटाईत असलेल्या एखाद्या प्रचारकाची थोडक्यात मुलाखत घ्या.

१५ मि: तुम्ही बायबल अभ्यास सुरू करू शकता का? श्रोत्यांबरोबर चर्चा. बायबल अभ्यास सुरू करण्याच्या हेतूने बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा. या पुस्तकातील काही उल्लेखनीय वैशिष्ट्यांची उजळणी करा. हे पुस्तक, पहिल्याच भेटीत आवड दाखवलेल्या लोकांना आपण पुन्हा भेट देतो तेव्हा, ज्यांनी मासिक स्वीकारले आहे त्यांच्याकडे पुन्हा जातो तेव्हा किंवा घरोघरच्या कार्यात कसे दिले जाऊ शकते, त्यावर चर्चा करा. (पाहा km-MR ८/०७ पृ. ५; km-MR १/०६ पृ. ३-६.) एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.

गीत क्र. २ (१५)

जुलै ७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१० मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: स्थानीय गरजा.

२० मि: “घरमालक वेगळी भाषा बोलत असल्यास.”c सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. परिच्छेद २ वर चर्चा करताना, मंडळीच्या क्षेत्रात, इतर कोणत्या भाषेचे गट किंवा मंडळ्या सेवा करत आहेत ते सांगा. या भाषांच्या गटांना किंवा मंडळ्यांना प्रचार कार्यात सहकार्य देण्याकरता कोणत्या विशिष्ट योजना करण्यात आल्या आहेत त्यांची उजळणी करावी.

गीत क्र. ४ (४३)

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा