घोषणा
▪ साहित्य सादरता जून: देवाचा मानवजातीने केलेला शोध (इंग्रजी) किंवा बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी). ज्या मंडळ्यांकडे ही प्रकाशने नाहीत त्या एकमात्र खऱ्या देवाची उपासना करा (इंग्रजी) हे पुस्तक सादर करू शकतात. जुलै व ऑगस्ट: कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक: सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, नंदनवन आणविणारे सरकार, देवाचे मार्गदर्शन—नंदनवनाकडे नेणारा मार्ग (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी). सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करावा. घरमालकाकडे हे प्रकाशन आधीपासूनच असेल तर, बायबल अभ्यास करून फायदा कसा मिळवता येईल, त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
▪ ऑगस्ट महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे हा महिना सहायक पायनियर सेवा करण्याकरता उत्तम ठरू शकेल.
▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने मार्च, एप्रिल व मे महिन्याचा मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. हिशेब तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.—इंस्ट्रक्शन्स फॉर काँग्रिगेशन अकाउंटिंग (S-27) यातील माहिती पडताळून पाहावी.
▪ आम्ही असे सुचवू इच्छितो की सामान्य पायनियर सेवेकरता केलेले अर्ज, विनंती केलेल्या तारखेच्या कमीतकमी ३० दिवसांआधी शाखा दफ्तराला सादर केले जावेत. अर्ज पाठवण्याआधी मंडळीच्या सचिवांनी, ते पूर्णपणे भरले आहेत की नाही याची खात्री करावी. जर अर्जदारांना बाप्तिस्म्याची नेमकी तारीख आठवत नसेल, तर त्यांनी अंदाजे तारीख भरावी आणि या तारखेची नोंद करून ठेवावी. सचिवांनीही या तारखेची मंडळीचे प्रचारक अहवाल कार्ड (S-21) यावर नोंद करावी.
▪ जानेवारी २००८ पासून, टेहळणी बुरूज व सावध राहा! यांच्या इंग्रजी व स्पॅनिशमधील ऑडिओ फाईल्स www.jw.org. या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पुष्कळ जण ही ऑडिओ मासिके डाऊनलोड करणे पसंत करतात; यामुळे, मंडळ्यांमध्ये सीडी किंवा एमपी३ डिस्क येण्याआधीच त्यांना ही मासिके मिळतात. जेव्हा जेव्हा अशा प्रकारे डाऊनलोड केले जाते तेव्हा तेव्हा संघटनेला इंटरनेट कंपन्यांना खर्च द्यावा लागतो. तरीसुद्धा, डिस्क तयार करून त्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यासाठी संस्थेला जितका खर्च येतो त्याच्या तुलनेत हा खर्च परवडण्याजोगा आहे. यास्तव, जे प्रचारक अशा पद्धतीने इंटरनेटवरून मासिके डाऊनलोड करतात त्यांनी, सीडी किंवा एमपी३ची मॅग्झीन सर्व्हंटकडे दिलेली ऑर्डर रद्द करावी. इंग्रजी व स्पॅनिश भाषांव्यतिरिक्त इतरही भाषांमध्ये ऑडिओ कार्यक्रम www.jw.org. या वेबसाईटवर हळूहळू उपलब्ध केले जातील.
▪ वडील वर्गाने, विपत्तीच्या तयारीविषयी आणि प्रत्येक प्रचारकाची अद्ययावत संपर्क माहिती ठेवण्याविषयी जुलै ६, २००६ तारीख असलेल्या पत्राची उजळणी करावी. विपत्तीचा संभव असणाऱ्या क्षेत्रात, तातडीच्या प्रसंगी अधिक संपर्क माहिती प्राप्त केली पाहिजे. तातडीच्या प्रसंगांव्यतिरिक्त, जर आपण जास्त काळ अनुपस्थित राहणार असू, जसे की सुटीसाठी किंवा कामानिमित्ताने बाहेर जाणार असू अथवा हॉस्पिटलमध्ये राहणार असू, तर आपल्या अनुपस्थितीविषयी प्रचारकांनी आपल्या मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना किंवा इतर एखाद्या वडिलांना सांगणे उचित असेल.
▪ येत्या २००८ प्रांतीय अधिवेशनाची जाहिरात करण्याकरता कोणत्याही प्रकारच्या आमंत्रण पत्रिकांचे वाटप केले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. पण, लवकरच आम्ही संपूर्ण विश्वभरात एका महत्त्वपूर्ण मोहीमेची योजना करीत आहोत. याविषयीची अधिक माहिती नंतर दिली जाईल.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
“चल, माझ्यामागे ये”—मोठ्या छपाईचे —इंग्रजी
हे पुस्तक, स्पेशल रिक्वेस्ट आयटम असल्यामुळे, ज्यांना दृष्टिदोष आहे व लहान अक्षरे वाचण्यास त्रास होतो केवळ त्यांच्यासाठीच उपलब्ध करण्यात येईल. यास्तव, दृष्टिदोष असलेल्या प्रचारकांनी खास मागणी केल्यारच या पुस्तकाची ऑर्डर पाठवावी. संस्थेला ही ऑर्डर पाठवण्याआधी सेवा समितीने, या पुस्तकांची खरोखरच किती गरज आहे हे पाहावे आणि ते लिटरेचर रक्वेस्टवर नमूद करावे.
शांतीदायक जगातील जीवन (पत्रिका क्र. १५) —रशियन, स्पॅनिश