वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०८ पृ. ३
  • ‘उत्तर कसे द्यायचे हे समजून घ्या’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘उत्तर कसे द्यायचे हे समजून घ्या’
  • आमची राज्य सेवा—२००८
आमची राज्य सेवा—२००८
km ५/०८ पृ. ३

‘उत्तर कसे द्यायचे हे समजून घ्या’

अधिकांश लोकांना संदेश ऐकून घेण्यात रस नसलेल्या भागात प्रचार करणे किती कठीण असते हे प्रेषित पौलाला चांगल्या प्रकारे माहीत होते. सा.यु. ५६ साली जेरुसलेमेत असताना त्याच्यासमोर आलेल्या प्रसंगाला त्याने कसे तोंड दिले ते पाहा. (प्रे. कृत्ये २१:२७, २८, ३०, ३९, ४०.) त्याने लोकांच्या मनात असलेले पूर्वग्रह कमी करण्यासाठी व सुवार्तेचा कमीतकमी विरोध व्हावा म्हणून बोलताना योग्य शब्दांचा काळजीपूर्वक वापर करण्याचे महत्त्व जाणले. (प्रे. कृत्ये २२:१, २) पौलाचे बोलणे ऐकणाऱ्‍यांनी आपली मनोवृत्ती बदलली नाही, पण त्याने जे शब्द वापरले त्यामुळे निदान या लोकांनी त्याचे बोलणे ऐकून तरी घेतले. (प्रे. कृत्ये २२:२२) स्वतःच्या अनुभवामुळे पौल कलस्सै येथील मंडळीतल्या बांधवांना ‘बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा, तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त असावे’ आणि जे विरोध करतात अशांना ‘कसकसे उत्तर द्यावयाचे ते समजून घ्यावे’ असे उत्तेजन देऊ शकला. (कलस्सै. ४:५, ६) सेवेमध्ये असताना आपणही हेच केले पाहिजे.

आपण शांतीने प्रचाराचे व शिकवण्याचे काम करण्याचा प्रयत्न करत असलो तरी, काही वेळा आपल्यासमोर असे प्रसंग येतात जेव्हा आपल्या कार्यांवर आक्षेप घेतला जातो. आपण बेकायदेशीरपणे ‘धर्मांतर’ करत आहोत, असाही आपल्यावर आरोप केला जातो. असा एखादा प्रसंग आपल्यावर आल्यास आपण त्याला कशा प्रकारे सामोरे जाऊ शकतो यासाठी आपण पूर्व तयारी करणे आवश्‍यक आहे. आपल्याला एकट्या घरमालकाच्या अथवा लोक समूहाच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागणार असली तरी, आपण शांत राहू शकतो व ही खात्री बाळगू शकतो, की यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याकरवी आपल्याबरोबर असेल. (मत्त. १०:१९, २०) एक गोष्ट लक्षात ठेवा, बोलताना तुम्ही योग्य शब्दांचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे. समोरच्या व्यक्‍तीच्या मनात गैरसमज उत्पन्‍न करू शकणारे किंवा चुकीचा अर्थ देणारे शब्द टाळा. तुम्ही देवाच्या वचनातील एका सुवार्तेचा “प्रचार” करीत आहात असे म्हणण्याऐवजी चांगली बातमी “सांगत” आहात असे म्हणा. किंवा, आम्ही प्रकाशने “देत” आहोत असे म्हणण्याऐवजी ही प्रकाशने वाचण्याचे “उत्तेजन” देत आहोत, असे म्हणा. अर्थात येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्याची जी कामगिरी आपल्याला मिळाली आहे त्यामुळे आपल्याला लाज वाटत नसली तरीसुद्धा आपण हुशार अथवा व्यवहारकुशल असले पाहिजे.

“तुम्ही धर्मप्रसार/धर्मांतर करत आहात,” असे कोणी म्हटले तर तुम्ही कसे उत्तर देऊ शकता? तुम्ही म्हणू शकता: “आम्ही कोणालाही त्यांचा धर्म बदलण्यास सांगत नाही आणि निश्‍चितच कोणालाही लालूच दाखवत नाही.” तुम्ही पण त्यांच्याप्रमाणेच कंपनीत कामाला आहात/गृहिणी आहात/विद्यार्थी आहात हे तुम्ही त्यांना सांगू शकता. कदाचित तुम्ही असे म्हणू शकता: “मी तुमच्या शेजारीच राहतो व तुम्हाला एक सांत्वनदायक व प्रोत्साहन माहिती देण्यासाठी आलो आहे. ही माहिती ज्याची इच्छा असेल तो ऐकू शकतो, नाहीतर नाही.” किंवा कदाचित तुम्ही असेही म्हणू शकता: “मी तुम्हाला जी माहिती सांगायला आलो आहे ती रेडिओवरील किंवा टीव्हीवरील एखाद्या घोषणेप्रमाणे आहे. काही लोक या घोषणेकडे लक्ष देतात तर काही देत नाहीत, त्यांची पसंत. पण समजा ती घोषणा आपल्या जीवन व मृत्यूशी निगडीत असेल तर काय? तुम्हाला ती ऐकावीशी वाटणार नाही का? मी तुम्हाला एका शांतीमय नवीन जगाविषयी सांगायला आलो आहे जेथे सर्व लोक ऐक्याने नांदतील. ठीक आहे, तुमची ऐकण्याची इच्छा नसेल तर मी निघतो.”

तुम्हाला कधीकधी असेही लोक भेटतील जे तुम्हाला म्हणतील: “आम्ही आमच्या मूर्ती फेकून द्याव्यात व आमच्या देवांची उपासना करायचं सोडून द्यावं, असं तुम्हाला म्हणायचं का?” पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांवरही असाच दोषारोप लावण्यात आला होता. (प्रे. कृत्ये १९:२३-४१) अशावेळी तुम्ही त्यांना म्हणू शकता: “यहोवाचे साक्षीदार कोणाचाही न्याय करत नाहीत. किंवा, लोकांनी कशा प्रकारे उपासना केली पाहिजे हे त्यांना सांगत नाहीत. हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. लोकांचा व कुटुंबांचा फायदा होईल असे देवाच्या वचनातील विचार फक्‍त मी सांगतोय. कोणालाही ऐकण्याची जबरदस्ती केली जात नाही. तुम्हाला जर आणखी बोलायची इच्छा नसेल तर तुम्ही मला तसं सांगू शकता.” अशा प्रकारे आपण आपल्याला मिळालेल्या कामगिरीशीही तडजोड करीत नाही आणि त्याचबरोबर योग्य शब्दांचा वापर करून तंग झालेले वातावरण निवळू शकतो.

आपण सेवेमध्ये जातो तेव्हा कधीकधी लोकांचा आपल्याविषयी गैरसमज होऊ शकतो व ते आपला विरोधही करतील. तरीपण सेवेतला आपला आनंद आपण टिकवून ठेवू शकतो आणि यहोवा सदोदीत आपल्या पाठीशी आहे, ही खात्री बाळगू शकतो. (२ करिंथ. २:१५-१७) लोक आपला कितीही विरोध करत असले तरी, सेवेतला आनंद आपण कधीही कमी होऊ देऊ नये. (नहे. ८:१०) प्रत्येकाला उत्तर कसे द्यायचे हे समजून घेण्यासाठी पूर्वतयारी करताना आपण नेहमी शांती कायम राखण्याचा व बोलण्यात सर्वदा कृपायुक्‍त असण्याचा आपला हेतू लक्षात ठेवू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा