वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०८ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००८
  • उपशिर्षक
  • एप्रिल १४ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल २१ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल २८ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे ५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००८
km ४/०८ पृ. २

सेवा सभा आराखडा

एप्रिल १४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २७ (२२१)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, एप्रिल-जून अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

१५ मि: “कृतज्ञ असा.”a वेळ असल्यास श्रोत्यांना उल्लेखित शास्त्रवचनांवर टिपणी देण्यास सांगा.

२० मि: “शोक करणाऱ्‍यांना सांत्वन द्या.”b प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूमुळे शोकाकूल असलेल्यांना सांत्वन दिल्याचे काही उल्लेखनीय अनुभव सांगण्यास श्रोत्यांना निमंत्रित करावे.

गीत क्र. २१ (१९१)

एप्रिल २१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ११ (८५)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. ज्यांना नियतकालिके दिली होती, अशा व्यक्‍तींना तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? या पत्रिकेच्या साहाय्याने पुनर्भेट कशी देता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवावे. घरमालकाने आस्था व्यक्‍त केल्यास, पत्रिकेतील पहिल्या पाच परिच्छेदांकडे त्यांचे लक्ष वेधून बायबल अभ्यास करण्यास आवडेल का असे त्यांना विचारा. जे स्मारकविधी किंवा खास जाहीर भाषणाला उपस्थित राहिले होते, पण ज्यांनी अद्याप बायबल अभ्यास स्वीकारलेला नाही अशांना पुनर्भेट देण्यास विसरू नका. पुढच्या सप्ताहातील सेवा सभेला येताना टेहळणी बुरूज एप्रिल-जून अंक सोबत आणण्याची आणि स्थानीय क्षेत्रात वापरता येण्याजोग्या सादरतांवर चर्चा करण्यास तयारी करून येण्याची सर्वांना आठवण करून द्यावी.

१० मि: स्थानीय गरजा.

२५ मि: “बायबलमधून वचन केव्हा दाखवायचे व प्रकाशने कधी सादर करायची?”c हा भाग सुयोग्य वडिलांनी हाताळावा. लेखातील माहिती स्थानिक परिस्थितीला लागू करावी.

गीत क्र. ६ (४५)

एप्रिल २८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १ (१३)

१५ मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना एप्रिल महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी. टेहळणी बुरूज एप्रिल-जून अंकातील विषयांची थोडक्यात उजळणी करून, आपल्या क्षेत्रातील लोकांना यांपैकी कोणते लेख आवडतील व का? हे सांगण्यास श्रोत्यांना निवेदन करावे. ते कोणत्या लेखांचा वापर करणार व नियतकालिक कशा प्रकारे सादर करणार हे त्यांना विचारावे. संभाषण सुरू करण्याकरता कोणता प्रश्‍न विचारता येईल? त्यानंतर लेखात दिलेले कोणते शास्त्रवचन वाचता येईल? या शास्त्रवचनाचा सुरुवातीला विचारलेल्या प्रश्‍नाशी कशा प्रकारे संबंध जोडता येईल? श्रोत्यांनी सुचवलेल्या एखाद्या सादरतेचा उपयोग करून नियतकालिक कसे सादर करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

१० मि: प्रश्‍न पेटी. श्रोत्यांसोबत चर्चा.

२० मि: “त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला.”d वेळ असल्यास श्रोत्यांना उल्लेखित शास्त्रवचनांवर टिपणी देण्यास सांगा.

गीत क्र. २३ (२००)

मे ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१० मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: यहोवावर आपल्या सर्व चिंता टाका. टेहळणी बुरूज नोव्हेंबर १५, १९९४ अंकातील पृष्ठे २१-२५ वरील माहितीच्या आधारावर प्रोत्साहनदायक भाषण.

२० मि: “सेवाकार्यात प्रगतीशील असा.”e ३ ऱ्‍या परिच्छेदाची चर्चा करताना सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठे ६-८ वरील “पुरेपूर फायदा कसा घ्यावा” या उपशीर्षकातील मुद्द्‌यांचा समावेश करावा.

गीत क्र. ८ (५३)

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा