घोषणा
▪ साहित्य सादरता फेब्रुवारी: तुमच्याविषयी काळजी करणारा निर्माणकर्ता अस्तित्वात आहे का? (इंग्रजी) किंवा कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य. मार्च: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करा. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज नियतकालिक. स्मारकविधी आणि त्यानंतरच्या खास जाहीर भाषणाला उपस्थित असलेल्या परंतु मंडळीसोबत सक्रिय नसलेल्या आस्थेवाईक लोकांना या महिन्यांमध्ये भेट देण्याचा खास प्रयत्न केला जाईल. अशा भेटी देण्याचा उद्देश, ज्यांनी अद्याप गृह बायबल अभ्यास स्वीकारलेला नाही अशांबरोबर अभ्यास सुरू करणे हा असला पाहिजे.
▪ मार्च महिन्यात पाच शनिवार-रविवार असल्यामुळे हा महिना साहाय्यक पायनियरींगकरता उत्तम आहे.
▪ मंडळीच्या सचिवांनी व सेवा पर्यवेक्षकांनी सामान्य पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. जर कोणाला तास भरण्याच्या संबंधाने अडचण असेल तर वडिलांनी त्यांना मदत पुरवण्याची व्यवस्था करावी.
▪ २००८ सालच्या स्मारकविधी काळात खास जाहीर भाषणाचा विषय, “मानवजातीवर राज्य करण्यास कोण योग्य आहे?” असा आहे. अशीच एक घोषणा आमची राज्य सेवा सप्टेंबर २००७ अंकात आली आहे.
▪ लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) याच्या पृष्ठ २ वर देण्यात आलेल्या यादींतील सर्व फॉर्म्सचा पुरेसा साठा मंडळीच्या सचिवांनी ठेवावा. या फॉर्म्समध्ये, फिल्ड सर्व्हिस रिपोर्ट (S-4), हाऊस-टू-हाऊस रेकॉर्ड (S-8), काँग्रीगेशन्स पब्लिशर रेकॉर्ड (S-21), रिसिट (S-24), काँग्रीगेशन मिटिंग अटेंडन्स रेकॉर्ड (S-88), थिओक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल असाईनमेंट (S-89), ॲप्लिकेशन फॉर ऑक्झिलरी पायनियर सर्व्हिस (S-205b), ड्यूरेबल पावर ऑफ ॲटर्नी फॉर हेल्थ केअर (dpa) व आयडेंटीटी कार्ड (ic) यांचा समावेश आहे. लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) भरून वरील फॉर्म्स मागवले जाऊ शकतात. एक वर्ष पुरेल इतका साठा मंडळीत असू द्या.
▪ उपलब्ध असलेली नवीन ऑडिओ कंपॅक्ट डिस्क:
बायबल नेमके काय शिकवते?—MP3 —इंग्रजी
▪ उपलब्ध असलेल्या नवीन डिव्हिडी:
त्यांनी सुवार्तेची निश्चित्तार्थाने साक्ष दिली —अमेरिकन संकेत भाषा
तुमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा —अमेरिकन संकेत भाषा
देवाचा आदर करणाऱ्या ध्येयांचा पाठलाग करा —इंग्रजी
शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे २००८ आणि २००८ कॅलेंडर यांच्यासोबत देवाचा आदर करणाऱ्या ध्येयांचा पाठलाग करा (इंग्रजी) या डिव्हिडीची एक एक प्रत सर्व मंडळ्यांना पाठवण्यात आली आहे. जे प्रचारक हा व्हिडिओ पाहू इच्छितात ते मंडळीकडून तो घेऊन पुन्हा परत करू शकतात. भविष्यात जर या व्हिडिओच्या आणखी प्रती निघाल्याच तर त्याविषयीची घोषणा आमची राज्य सेवा यात केली जाईल आणि मग तुम्ही जादा प्रती मागवू शकता.