ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
फेब्रुवारी २५, २००८ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, जानेवारी ७ ते फेब्रुवारी २५, २००८ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. श्रोत्यांना शास्त्रवचनांचा नेमका अर्थ समजावा म्हणून आपण काय केले पाहिजे आणि असे करणे का गरजेचे आहे? [be पृ. २२८ परि. २-३]
२. आपली भाषणे श्रोत्यांकरता माहितीपूर्ण बनवणे का महत्त्वाचे आहे आणि आपण हे कसे साध्य करू शकतो? [be पृ. २३० परि. ३-५, चौकट]
३. संशोधनामुळे आपली भाषणे अधिक माहितीपूर्ण कशी बनू शकतात? [be पृ. २३१ परि. १-३]
४. ओळखीच्या वचनांवर चर्चा करताना आपण ही चर्चा अधिक माहितीपूर्ण कशी बनवू शकतो? [be पृ. २३१ परि. ४-५]
५. वाचलेल्या शास्त्रवचनांवर तर्कवाद करणे का महत्त्वाचे आहे? [be पृ. २३२ परि. ३-४]
नेमणूक क्र. १
६. आपण सर्व अपरिपूर्ण आहोत हे लक्षात घेता, सैतानाच्या नियंत्रणात असलेल्या या जगावर आपण विजय कसा मिळवू शकतो? [wt पृ. ७६ परि. १३]
७. वक्त्याच्या माध्यमातून देवाकडील शिक्षण मिळवण्याकरता आपण आपले हृदय कशाप्रकारे तयार करू शकतो? (२ इति. २०:३३) [be पृ. १३ परि. ४-पृ. १४ परि. ५]
८. आपल्या मुलांना “तारणासाठी ज्ञानी” होण्यास मदत करण्यासाठी आईवडील काय करू शकतात? (२ तीम. ३:१५) [be पृ. १६, परि. ३-४]
९. पुनरुत्थानास “प्राथमिक” शिकवण का म्हणता येते? [wt पृ. ८० परि. ४]
१०. पुनरुत्थानाची आशा कशाप्रकारे आपल्याला बळ देऊ शकते? [wt पृ. ८८ परि. १६]
साप्ताहिक बायबल वाचन
११. क्रोध व्यक्त करणे हे मनात क्रोध बाळगण्यापेक्षा जास्त गंभीर आहे का? (मत्त. ५:२१, २२) [w०८-MR १/१५ “यहोवाचे वचन सजीव आहे—मत्तय पुस्तकातील ठळक मुद्दे”]
१२. ख्रिस्ती आपला डोळा निर्दोष कसा ठेवू शकतात? (मत्त. ६:२२, २३) [w०६-MR १०/१ पृ. ३०]
१३. “तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय” असे आपल्या शिष्यांना विचारताना येशू त्यांना काय सांगू इच्छित होता? (मत्त. १३:५१, ५२) [w०८-MR १/१५ “यहोवाचे वचन सजीव आहे—मत्तय पुस्तकातील ठळक मुद्दे”]
१४. येशू ज्यांचे रोग बरे करायचा त्यांना तो सहसा “मला प्रगट करू नका” अशी ताकीद का द्यायचा? (मत्त. १२:१६) [w९०-MR ४/१ पृ. ९; cl पृ. ९३-४]
१५. “ज्या मापाने” आपण ‘मापून देतो’ त्याविषयी बोलताना येशू कोणता मुद्दा स्पष्ट करत होता? (मार्क ४:२४:२४, २५) [w८० ६/१५ पृ. १२; gt-MR अध्या. ४३]