वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०८ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००८
  • उपशिर्षक
  • जानेवारी १४ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी २१ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी २८ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी ४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००८
km १/०८ पृ. २

सेवा सभा आराखडा

जानेवारी १४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, जानेवारी-मार्च अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

१५ मि: “सेवेत तुम्ही घालवत असलेल्या वेळेचा सदुपयोग करा.”a क्षेत्र सेवेत आपल्या गटाचे नेतृत्व करण्यात उत्तम उदाहरण असलेल्या बांधवाची मुलाखत घ्या. गटाचे नेतृत्व करण्याकरता आणि सेवेमध्ये आपण घालवत असलेल्या वेळेचा सदुपयोग करण्याकरता तो कशी तयारी करतो?

२० मि: “तुमचे बोलणे सर्वदा . . . मिठाने रुचकर केल्यासारखे असावे.”b परिच्छेद २ वर चर्चा करताना योहान ४:७-१५, ३९ वाचा.

गीत क्र. ११ (८५)

जानेवारी २१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

१० मि: स्थानीय घोषणा. फेब्रुवारी महिन्यात आपण क्षेत्र सेवेत कोणते प्रकाशन सादर करणार आहोत ते सांगा आणि एखादे प्रात्यक्षिक दाखवा. फेब्रुवारी ४ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहादरम्यानच्या सेवा सभेत होणाऱ्‍या भागाची तयारी म्हणून सर्वांना संक्रमण-पर्यायी वैद्यकीय सेवा—रुग्णाच्या गरजा व हक्क पूर्ण करणे (इंग्रजी), हा व्हिडिओपट पाहण्याचे उत्तेजन द्या.

१० मि: तुम्ही, शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे या पुस्तिकेचा उपयोग करता का? शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—२००८ मधील प्रस्तावनेवर आधारित भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा. दररोजचे शास्त्रवचन व त्याखालील टिपणी यांची चर्चा करण्यास वेळ काढणे किती महत्त्वाचे आहे यावर चर्चा करा. श्रोत्यांना विचारा की दररोजचे शास्त्रवचन वाचण्यासाठी त्यांचा नित्यक्रम काय आहे व यापासून त्यांना कोणता लाभ झाला आहे. एक-दोघांच्या टिपणीची आधीच व्यवस्था केली जाऊ शकते. सन २००८ च्या वार्षिक वचनावर संक्षिप्त टिपणी द्या.

२५ मि: “प्रचार कार्य करताना धैर्य आणि समजदारी दाखवणे.”c पुरवणीतील १-१३ परिच्छेदांवर वडील श्रोत्यांबरोबर चर्चा करतील. या साहित्याची सभेमध्ये चर्चा करण्याआधी, वडील वर्गाने, स्थानीय परिस्थितीनुसार ही माहिती कितपत लागू करता येईल त्याची चर्चा करावी.

गीत क्र. ७ (५१)

जानेवारी २८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २३ (२००)

१० मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना जानेवारी महिन्याचा रिपोर्ट देण्याची आठवण करून द्या. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. जानेवारी-मार्च टेहळणी बुरूज याच्यावर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा करा. या अंकाविषयी थोडक्यात माहिती दिल्यानंतर, क्षेत्रातील लोकांना या मासिकातील कोणते लेख आवडू शकतील व का, हे विचारा. श्रोत्यांतील बंधूभगिनी जो लेख क्षेत्र सेवेत सादर करू इच्छितात त्या लेखातील काही विशिष्ट मुद्द्‌यांवर टिपणी देण्यास त्यांना सांगा. संभाषण सुरू करण्याकरता कोणता प्रश्‍न विचारता येईल? लेखातील कोणते शास्त्रवचन मग दाखवता येईल? या वचनाची आणि लेखाची सांगड कशी घालता येईल? एका उचित सादरतेचा उपयोग करून, हे मासिक कसे सादर करता येईल त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: स्थानीय गरजा.

२५ मि: “प्रचार कार्य करताना धैर्य आणि समजदारी दाखवणे.” पुरवणीतील १४-२७ परिच्छेदांवर प्रश्‍नोत्तराने चर्चा करा. हा भाग वडिलांनी हाताळावा. स्थानीय परिस्थितीनुसार लेखातील माहिती लागू करा.

गीत क्र. १६ (१४३)

फेब्रुवारी ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

१० मि: स्थानीय घोषणा. प्रश्‍न पेटीची उजळणी करा.

१५ मि: “राज्याच्या सुवार्तेचे प्रचारक होण्यास बायबल विद्यार्थ्यांना मदत करा.”d वेळ असल्यास, श्रोत्यांना उल्लेखित शास्त्रवचनांवर टिपणी देण्यास सांगा.

२० मि: “तुम्ही वेळ लावत आहात का?” वडिलांचे भाषण. रुग्णाच्या गरजा व हक्क व्हिडिओपटाच्या थेट चर्चेस सुरुवात करा आणि लेखात दिलेल्या प्रश्‍नांचा उपयोग करा. समारोपात, शेवटला परिच्छेद वाचा आणि सर्वांना टेहळणी बुरूज व आमची राज्य सेवा यांचे जे संदर्भ लेख दिलेले आहेत ते काळजीपूर्वक वाचून काढण्याचे उत्तेजन द्या. नोव्हेंबर २००६ च्या आमची राज्य सेवा यात असलेल्या प्रश्‍नावलीचा उपयोग करून, रक्‍ताचे अंश आणि वैद्यकीय प्रक्रियांविषयी व्यक्‍तिगत निर्णय घेऊन मग आपल्या आवडीनिवडी डिपीए कार्डावर कशा मांडायच्या ते समजावून सांगा. ज्यांचे डिपीए कार्ड आधीच भरून झाले आहे ते, त्यांनी आधी केलेल्या निवडींची उजळणी करून पाहू शकतात व त्यांना काही बदल करायचे असतील तर गरज असल्यास नवीन कार्ड भरू शकतात.

गीत क्र. २ (१५)

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा