सेवेत तुम्ही घालवत असलेल्या वेळेचा सदुपयोग करा
१ सेवेमध्ये आपल्याला खूप काही साध्य करायचे आहे व वेळही जास्त उरलेला नाही, यात काहीच शंका नाही. (योहा. ४:३५; १ करिंथ. ७:२९) उत्तम आयोजन व पूर्वतयारी करून आपण सेवेत घालवत असलेल्या वेळेचा सदुपयोग करू शकतो.
२ तयार असा: क्षेत्र सेवेच्या सभेला जाण्याआधी तुम्हाला लागणारी व तुम्ही जी सादरता तयार केली आहे त्यानुसारची प्रकाशने तुमच्याजवळ आहेत याची खात्री करा. प्रार्थनेने सभेची समाप्ती झाल्याबरोबर थेट क्षेत्रात जा. यामुळे तुम्हाला आणि तुमच्याबरोबर असलेल्या इतर बंधूभगिनींना क्षेत्र सेवेसाठी जो वेळ काढला आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घेता येईल.
३ तुम्हाला जर क्षेत्र सेवा सभा घेण्यास नेमण्यात आले असेल तर ही सभा वेळेवर सुरू करा. ही सभा संक्षिप्त ठेवा—१० ते १५ मिनिटांच्या वर ती असू नये. गटाला क्षेत्र सेवेत पाठवण्याआधी, प्रत्येकाला तो किंवा ती कोठे व कोणाबरोबर जाणार आहे हे माहीत आहे याची खात्री करा.
४ सेवेत: क्षेत्र सेवेची सभा संपल्यावर विनाकारण इकडे तिकडे घुटमळत राहू नका. सरळ क्षेत्रात जाण्यासाठी निघा. तुम्ही जर क्षेत्रातून लवकर जाणार असाल तर त्याविषयी तुमच्यासोबत कार्य करणाऱ्या प्रचारकाला आधीच सांगा जेणेकरून तो दुसऱ्याबरोबर प्रचारकार्य चालू ठेवण्यासाठी आधीच व्यवस्था करू शकेल. गटाबरोबर सेवा करताना, इतरांचा विचार करा. तुम्ही कदाचित एखाद्या चर्चेत अडकला असाल आणि संपूर्ण गट तुमची वाट पाहत थांबलेला असेल. अशावेळी, तुमच्याबरोबर जर कोणी वाद घालत असेल तर व्यवहारकुशलतेचा उपयोग करून चर्चा थांबवा किंवा जर कोणी आस्थेवाईक भेटला असेल तर त्याला पुन्हा भेटण्याची योजना करा.—मत्त. १०:११.
५ पुनर्भेटी करताना, एकाच क्षेत्रात अनेक पुनर्भेटी असल्यास त्या एकसाथ कराव्यात आणि मग दुसऱ्या क्षेत्रात असलेल्या पुनर्भेटी कराव्यात. यामुळे तुमचा प्रवासात खर्च होणारा वेळ वाचू शकेल. कदाचित तुम्ही ज्यांना पुन्हा भेट द्यायला जात आहात त्यांना फोन करून विचारू शकता, की तुम्ही जाल तेव्हा ते घरी भेटतील अथवा नाही. (नीति. २१:५) तुम्ही ज्या पुनर्भेटीला जाणार आहात तिथे तुमचा बहुतेक वेळ जाईल असे जर तुम्हाला वाटत असेल तर पुनर्भेट करून येईपर्यंत तुमच्याबरोबर प्रचार कार्य करणाऱ्यांना तुम्ही जवळच्या एखाद्या क्षेत्रात सेवेसाठी अथवा पुनर्भेटींसाठी पाठवू शकता.
६ आपण मोठ्या प्रमाणात चाललेल्या आध्यात्मिक कापणीच्या काळात जगत आहोत. (मत्त. ९:३७, ३८) लवकरच हे काम बंद होणार आहे. यास्तव, सेवेत आपण घालवत असलेल्या वेळेचा सदुपयोग करण्याची आपली इच्छा असली पाहिजे.