ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
डिसेंबर ३१, २००७ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, नोव्हेंबर ५ ते डिसेंबर ३१, २००७ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील.
भाषणाचे गुण
१. आपल्या भाषणाची समाप्ती प्रभावी आहे किंवा नाही याची खात्री करण्याकरता आपण कोणते मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत? [be पृ. २२० परि. ४-पृ. २२१ परि. ३]
२. आपण क्षेत्र सेवेत जे काही बोलतो ते अचूक आहे याची आपण खात्री कशी करू शकतो? [be पृ. २२३ परि. २-४]
३. मंडळीमध्ये भाषण देताना, मंडळी ही “सत्याचा स्तंभ व पाया” आहे हे आपण कबूल करतो हे कसे दाखवू शकतो? (१ तीम. ३:१५) [be पृ. २२४ परि. १-४]
४. आपण सादर करत असलेली माहिती विश्वसनीय आहे किंवा नाही याची आपण खात्री का केली पाहिजे आणि आपण हे कसे करू शकतो? [be पृ. २२५ परि. १-२]
५. इतरांना शिकवताना आपण, वापरत असलेली माहिती त्यांना सहज समजेल अशी कशी बनवू शकतो? [be पृ. २२६ परि. ३-पृ. २२७ परि. १]
नेमणूक क्र. १
६. समस्यांकडे नेणाऱ्या इच्छा कशा जागृत होतात? [wt पृ. ४७ परि. १३]
७. एदेन बागेत सैतानाने कोणता वादविषय उभा केला होता? [wt पृ. ५० परि. १]
८. आपण अपरिपूर्ण मानव असूनही यहोवा देवाशी एकनिष्ठ कसे राहू शकतो? [wt पृ. ५६, परि. १४]
९. यहोवाने आपल्यासाठी कोणत्या प्रेमळ तरतूदी केल्या आहेत? [wt पृ. ६० परि. १]
१०. आपण यहोवाची उपासना करीत असलो तरी, सैतान आपल्याला खोट्या धर्माचे आमीष कसे दाखवू शकतो? [wt पृ. ७३ परि. ८]
साप्ताहिक बायबल वाचन
११. पहिल्या शतकात किड्यांच्या धाडीविषयी योएलने केलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली, आणि ती भविष्यवाणी आज कशी पूर्ण होत आहे? (योए. २:१-१०, २८) [w०७-MR १०/१ “यहोवाचे वचन सजीव आहे—योएल आणि आमोस पुस्तकातील ठळक मुद्दे”]
१२. “पक्व फळांची पाटी” कशास सूचित करते? (आमो. ८:१, २) [w०७-MR १०/१ “यहोवाचे वचन सजीव आहे—योएल व आमोस पुस्तकातील ठळक मुद्दे”]
१३. कोणत्या अर्थाने, यहोवा “त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला”? (योना ३:१०) [w०३-MR ७/१५ पृ. १७-१८]
१४. यहोवाच्या नावाने चालण्याचा काय अर्थ होतो? (मीखा ४:५) [w०३-MR ८/१५ पृ. १७, परि. १९]
१५. आधुनिक काळात यहोवा “आपल्या मंदिरात” न्याय करण्यासाठी केव्हा व कसा आला? (मला. ३:१-३) [re-MR ३२ चौकोन; jd पृ. १७९ परि. ३-पृ. १८१ परि. ६]