वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०७ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००७
  • उपशिर्षक
  • नोव्हेंबर १२ ने सुरू होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर १९ ने सुरू होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर २६ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर ३ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००७
km ११/०७ पृ. २

सेवा सभा आराखडा

नोव्हेंबर १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ५ (४६)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, नोव्हेंबर १ आणि सावध राहा! ऑक्टोबर-डिसेंबर अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. प्रात्यक्षिकांत कोणतेही एक मासिक सादर करण्यात आले तरीसुद्धा घरमालकाला मासिके देताना दोन्ही मासिके द्यावीत.

१५ मि: “रुपे माझे आहे, सोने माझे आहे.” टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, २००७, पृष्ठे १९-२३ वरील लेखावर आधारित वडिलांचे भाषण.

२० मि: “ज्ञान्यांसारखे चाला.”a वेळ असेल तर श्रोत्यांना उद्धृत शास्त्रवचनांवर टिपणी देण्याचे आमंत्रण द्या.

गीत क्र. २१ (१९१)

नोव्हेंबर १९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २ (१५)

१० मि: स्थानीय घोषणा. डिसेंबर महिन्यात कोणते प्रकाशन सादर करणार ते सांगा आणि एखादे प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: स्थानीय गरजा.

२० मि: “माघार घेऊ नका!”b परिच्छेद ५ वर चर्चा करताना, सत्यात आलेल्यांबरोबर अभ्यास केलेल्यांच्या टिपणींचा समावेश करा. प्रगती करणारा बायबल अभ्यास संचालित करणे प्रतिफळदायी व आनंददायक कसा असतो? एक किंवा दोन जणांना टिपणी करण्यास आधीपासूनच नेमावे.

गीत क्र. ६ (४५)

नोव्हेंबर २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ४ (४३)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. प्रचारकांना नोव्हेंबर महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी. पृष्ठ ४ वर दिलेल्या सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता योग्य असलेल्या वेगळ्या सादरतेचा उपयोग करून टेहळणी बुरूज डिसेंबर १ व सावध राहा! ऑक्टोबर-डिसेंबर हे अंक कसे सादर करता येतील हे प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवावे.

१५ मि: प्रेम व्यक्‍त करण्याकरता तुम्हाला आपले अंतःकरण विशाल करता येईल का? टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, २००४, पृष्ठे १४-१९ वरील लेखावर आधारित वडिलांचे भाषण.

२० मि: बालकांनो, यहोवाची स्तुती करा! टेहळणी बुरूज जुलै १, २००५ पृष्ठे १६-१७ वरील परिच्छेद १५-१९ आणि त्यांच्या प्रश्‍नांचा उपयोग करून चर्चा करा. परिच्छेद १८ वर चर्चा करताना, श्रोत्यांतील तरुणांना, त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांना अथवा शिक्षकांना कशाप्रकारे साक्ष दिली आहे त्याबद्दलचा अनुभव सांगण्याचे आमंत्रण द्या.

गीत क्र. १६ (१४३)

डिसेंबर ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १७ (१८७)

१५ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. प्रश्‍न पेटीची उजळणी करा.

१५ मि: संपूर्ण जगभरातील लोकांना मदत करणारे पदवीधर तयार करणारी प्रशाला. आमची राज्य सेवा, मार्च २००५, पृष्ठ ५ व ६ यावर आधारित भाषण. मंडळीत, सेवा प्रशिक्षण प्रशालेत हजर राहिलेल्या कोणत्याही वडिलांची अथवा सेवा सेवकांची संक्षिप्त मुलाखत घ्या. या प्रशालेने त्यांना, सुवार्तिक, मेंढपाळ व शिक्षक म्हणून प्रगती करण्यास कशाप्रकारे मदत केली? सेवा प्रशिक्षण प्रशालेसाठी पात्र ठरणाऱ्‍या बांधवांना या प्रशालेत उपस्थित राहण्याचे ध्येय ठेवण्याचे उत्तेजन द्या.

१५ मि: “आपली राज्य आशा आपण इतरांनाही सांगतो.”c वेळ असेल तर श्रोत्यांना उद्धृत शास्त्रवचनांवर टिपणी देण्याचे आमंत्रण द्या.

गीत क्र. २३ (२००)

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा